अंगणवाडी सेविका रिज़वाना बाजी उमराह साठी रवाना
अंगणवाडी सेविका रिज़वाना बाजी उमराह साठी रवाना
सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांच्याकडून हृदयी शुभेच्छा
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील अंगणवाडी सेविका रिज़वाना बाजी या पवित्र मक्का-मदीना येथे उमराहसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी त्यांना हृदयी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिंद्र भालेराव, जलील शेख, कांडेकर आणि इतरांची प्रमुख उपस्थिती होती.
रिज़वाना बाजी या दोन्ही पायाने विकलांग आहेत. त्यांनी या विकलांगतेवर मात करत सुरुवातीला हाताने चालवायची तीन चाकी रिक्षा चालवत अंगणवाडी सेविका म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. त्यानंतर चार चाकी मोटार सायकल घेऊन गेल्या काही वर्षापासून या चार चाकी वाहनाने त्या घरून अंगणवाडी व अंगणवाडी वरून घरी ये-जा करत अंगणवाडीत सेवा करतात तसेच शहरात इतर ठिकाणीही ते याच वाहनाने ये-जा करतात. त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि आपलेपणा त्यांना भेटणाऱ्याच्या मनात कायमचा घर करतो. यामुळे त्या शहरात अनेकांना परिचित आहेत. आयुष्यात प्रथमच त्या मक्का-मदीना येथे उमराहसाठी रवाना होणार असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांना कळाल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रपरिवारासह त्यांची भेट घेत हृदयी शुभेच्छा दिल्या आणि उमराह निमित्ताने त्यांची मक्का-मदीना यात्रा सुखरूप होवो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा