Breaking News

कोण म्हणतंय भारतात जातीयवाद पसरलाय, हे वाचा डोळे खाडकन उघडतील!

कोण म्हणतंय भारतात जातीयवाद पसरलाय, हे वाचा डोळे खाडकन उघडतील!

बीड (एस.एम.न्युज़) - येतील बहु जातील बहु, जातीय वादाची बीजे पेरतील बहु परंतु जोपर्यंत हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे, तोपर्यंत सर्व धर्मीयांना आणि पर्यायाने देशालाही धोका नाही. खरंच आजही माणुसकी जिवंत आहे.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या भारत देशात जातीयवादाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक निर्माण झाल्याचा बनाव काही पिटातले लोक करत आहेत. यामुळे देशात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या सर्वच धर्मीय नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात शंका-कुशंका असल्या तरी त्या पाण्यावर येणाऱ्या बुबुळासारख्या आहेत. पाण्यावरील बुबुळाला जसे जास्त आयुष्य नसते तसेच धर्मांधतेला सुद्धा नसते मात्र काही सडक्या मेंदूचे राजकारणी गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासावर, रोजगारावर, उद्योगावर चांगले राजकारण करण्याऐवजी आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याकरिता धर्माच्या कुबड्या घेऊन आपापले राजकारण करू लागले आहेत. असे असले तरी जोपर्यंत हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे तोपर्यंत सर्व धर्मीयांना आणि पर्यायाने देशालाही धोका नाही. हेही तेवढेच खरे, हे घ्या अजून एक उदाहरण -

बीड शहरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये आज दिनांक ९ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी दोन मुस्लिम युवकांनी पार्वताबाई सोमनाथ माळवे रा. सिन्नर जि. नाशिक यांना दाखल केले. बेघर जिव्हाळा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य, व्यवस्थापक राजू वंजारे, काळजीवाहक छायाताई सरोदे यांनी त्यांचे स्वागत करून बेघर जिव्हाळा केंद्रात दाखल करून घेतले.

तत्पूर्वी सय्यद अली अश्फाक आणि शेख शोएब यांनी माळवे आजींचा स्वतःच्या घरी मागच्या आठ दिवसापासून आपल्या आईप्रमाणे सांभाळ केला. आज आजींना त्यांनी सन्मानपूर्वक जिव्हाळा केंद्रामध्ये आणून सोडले. जाताना आजीबाईंना खर्चासाठी काही पैशांसह फळे, फरसाण इत्यादी वस्तू देऊन आजीचा निरोप घेऊन गेले. खरंच त्या दोन मुस्लिम युवकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्या दोघांसाठी आजीबाईंच्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते. त्यांनी सांगितले नाशिकला असताना सय्यद अली यांचं कुटुंब आमच्या घरा शेजारीच राहायला होतं, मला चार मुलं आणि दोन मुली परंतु दोन सुनबाईंनी घरातून हाकलून दिले. माझ्या सुनांनीच मला हाकलून दिल्यानंतर एखाद्या नातेवाईकाकडे यावे अशा पद्धतीने मी थेट बीड येथे सय्यद अली यांच्या घरी आले. त्यांनी माझा पाहुणचार आठ दिवस करून, मला या जिव्हाळा केंद्रामध्ये आणून सोडले. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत असेही शेवटी त्या म्हणाल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मातृभूमी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी म्हटले. यावेळी धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती.

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत