Breaking News

जल अभियंता परीक्षेत शेख लईख़ युसूफ़ विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण

जल अभियंता परीक्षेत शेख लईख़ युसूफ़ विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण

 
प्राचार्य, शिल्प निदेशकांसह नातेवाईकांकडून अभिनंदन व शुभेच्छा
बीड (एस.एम.न्युज़) - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात जल अभियंता (वॉटर इंजिनियर) परीक्षेत शेख लईख़ युसूफ़ विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण झाला याबद्दल प्राचार्य, शिल्प निदेशकांसह नातेवाईकांकडून अभिनंदन करण्यात आले.
एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा मुलगा शेख लईख़ युसूफ़ याने सन २०२४-२५ मधील बॅचमध्ये जल अभियंता अभ्यास क्रमाचे प्रशिक्षण घेतले. याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत त्याने एकूण ६०० पैकी ४९० गुण (८१%) मिळविले आणि विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण झाला. याबद्दल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि त्याला प्रशिक्षण व मार्गदर्शन देणारे शिल्प निदेशक कुलदीप निकम सर यांच्यासह दादा-दादी, अम्मी-अब्बू, बहन-भाई, फुप्पू-फुप्पा, मामू-मुमानी, ख़ाला-ख़ालू या सर्वांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी सदिच्छा व्यक्त करत हृदयी शुभेच्छा दिल्या.
===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत