Breaking News

शहरांतर्गत हवाई वाहतूक सेवा सुरू करण्याच्या मागणीनंतर रस्त्यावरील खड्डे भरले

शहरांतर्गत हवाई वाहतूक सेवा सुरू करण्याच्या मागणीनंतर रस्त्यावरील खड्डे भरले

नवीन बनविण्याऐवजी ठिगळ लावून बीड शहरवासियांची केली चेष्टा

बीड (एस.एम.न्युज़) - बीड शहरांतर्गत रस्त्यांवर हवाई वाहतूक सेवा सुरू करा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविल्यानंतर राजुरीवेस ते कारंजा टॉवर पर्यंत च्या रस्त्यावरील खड्डे काँक्रिटीकरणाने भरण्यात आले आहे. बीड नगर परिषदेची ही कार्य क्रिया म्हणजे बीड शहरवासियांची केलेली एक प्रकारची चेष्टाच असल्याचा घणाघात एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी केला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहरातील काही ठराविक रस्ते हे अत्यंत दयनीय अवस्थेत गेलेले आहेत. ज्यामुळे या रस्त्यांवरून चालताना बीड शहरवासियांच्या नाकीनऊ येत आहे. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक ना शासनाला आहे, ना प्रशासनाला. हे पाहता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांना ही सर्व बाब दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केली होती, तसेच त्यात या खराब रस्त्यांवरील खड्डे काँक्रिटीकरणाने किंवा डांबरीकरणाने बुजविण्याची प्रक्रिया अजिबात करता कामा नये ते नवीनच बनविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची प्रशासनाकडून नोंद तर घेण्यात आली परंतु नवीन रस्ते न करता, आहे त्याच खड्डेयुक्त रस्त्यांचे मोठमोठे खड्डे काँक्रिटीकरणाने भरण्यात आले. डांबरी रस्त्यावरील खड्डे सिमेंटकाँक्रीट ने भरण्याचा निर्णय घेतलेले अधिकारी आणि अभियंते कोण? असा प्रश्न उपस्थित करून लहान-सहान खड्डे तसेच सोडून देण्यात आल्याचेही म्हटले आहे. यामुळे बीड नगर परिषदेकडून करण्यात आलेली ही कार्य क्रिया म्हणजे बीड शहरवासियांची एक प्रकारची चेष्टाच असल्याचा घणाघात एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी केला आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत