पोलीस जमादार गायक राजेश राजगुरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पोलीस जमादार गायक राजेश राजगुरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत अंत्यसंस्कार
बीड (एस.एम.न्युज़) - महाराष्ट्र च्या बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात जमादार असलेले तसेच गोड गळ्याचे गायक म्हणून सर्व दूर ख्याती पसरलेले राजेश राजगुरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुलढाणा पोलीस दलात अत्यंत मनमिळावू, साधे सरळ व्यक्तिमत्व म्हणून राजेश राजगुरे सर्वप्रिय होते. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या हुबेहूब आवाजात ते गेल्या अनेक वर्षांपासून गायन करत असल्याने चांगले गायक म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते. शिवाय युट्युब वर सुद्धा त्यांचे चॅनेल असल्याने या माध्यमातून ते जवळपास जगभरात ओळखले जात होते. त्यांना दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०१:३० वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय अवघे ५१ वर्षाचे होते. अशाप्रकारे त्यांच्या अचानक निधनाने राजगुरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चाहत्यांचा तर त्यांच्या निधनवार्तेवर विश्वास बसत नव्हता. परंतु ते आता आपल्यात राहिले नाहीत. त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह उपअधीक्षक, अनेक फौजदार, पोलीस कर्मचारी, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवावर शेगाव येथील पाटील स्मशानभूमीत संध्याकाळी ०६:०० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजगुरे परिवाराच्या कधीही भरून न निघणाऱ्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा