राजकारणाच्या सारीपाटावरील रांगडा आमदार संदीप क्षीरसागर!
राजकारणाच्या सारीपाटावरील रांगडा आमदार संदीप क्षीरसागर!
पालकमंत्री येणार म्हटले की, जातीने उपस्थित राहून मतदारसंघाचे गऱ्हाणे मांडणारा लोकप्रतिनिधी
बीड (एस.एम.न्युज़) - स्वपक्षातील विरोधक असो की, विरोधी पक्षातील विरोधक. सर्वांसमोर राजकारणाच्या सारीपाटावरील रांगडा आमदार म्हणून आता संदीप क्षीरसागर यांची ओळख होऊ लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री अजित पवार बीड ला येणार म्हटले की, जातीने उपस्थित राहून मतदारसंघाचे इत्यंभूत गऱ्हाणे मांडणारा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संदीप क्षीरसागर नेहमी अजित पवारांसमोर ठामपणे उभे राहतात. या रांगड्या स्वभावामुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत भलेभले धडाधड कोसळले असताना त्यांनी एक हाती किल्ला लढवून बीड विधानसभा मतदार संघ फत्ते केला. असो!
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने नुकतेच अजित पवार दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघातील रस्ते आणि इतर विकास कामांच्या संदर्भात आ. संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्याकडे मागणी केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न आणि बाबींकडे बैठकांच्या माध्यमातून ना. अजित पवार यांनी नियोजन सुरू केले आहे. या अनुषंगाने गुरूवार दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीत आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील विकासाचे विविध प्रश्न आणि प्रस्ताव बैठकीत त्यांच्या समोर मांडले. तेव्हा ना. अजित पवार यांनी जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावांच्या संदर्भात सकारात्मक सूचना दिल्या.
आ. संदीप क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनातून मांडलेले मुद्दे
1) राष्ट्रीय महामार्ग 211 (नवीन क्र.52) महालक्ष्मी चौक ते जालना रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता या दोन्ही साईडने सहा (6) लाईन रोडसाठी व दोन्ही साईडने ड्रेनेजसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना द्या. 2) शिवशारदा ते अमरधाम स्मशानभुमी पर्यंत भुयारी गटारसाठी सूचना द्या. 3) ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा खोली, अंगणवाडी बांधकाम, पाणी पुरवठा व्यवस्था, जन सुविधेअंतर्गत स्मशानभुमी बांधकाम, पशु वैद्यकीय दवाखाने, वन विभागाचा विकास, कोल्हापुरी पद्धतीने बंधारे, सिमेंट नाला बंधारे या व इतर आवश्यक असलेली विकास कामे करणे. बीड शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील रहदारीसाठी रस्त्यांच्या अवस्थेमुळे मोठी अडचण होत आहे. बीड शहरातील रस्त्यांचा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा झाला आहे. यामुळे शहरातील रस्त्यांच्या विकासासंदर्भात प्रस्ताव देऊन बीड शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. पालवण चौक ते नगर रोड (धानोरा रोड), मदर टेरेसा चौक ते कालिका नगर कमान (अंकुशनगर मुख्य रस्ता), बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र. 7 मध्ये बलभीम चौक ते धोंडीपुरा मार्गे माळीवेस सिमेंट रस्ता करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.8 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरी वेस पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.08 मध्ये कारंजा टावर ते पिंगळे गल्ली ते बुंदेलपुरा मस्जिद रोड पर्यंत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.08 मध्ये राजुरी वेस ते बलभीम चौक व राजुरी वेस बुंदेलपुरा मार्ग कबाड गल्ली पर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.8 मध्ये राजुरीवेस-बुंदेलपुरा-कबाडगल्ली मार्गे माळीवेस सिमेंट रस्ता करणे. या कामांना मंजुरी देण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
आ.संदीप क्षीरसागरांना या दोन्ही प्रश्नांचा विसर?
राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. संदीप क्षीरसागर यांनी भली मोठी विकास कामांची यादी दिली असली तरी त्यात खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाच्या कामाचा उल्लेख नाही तसेच जवळपास साडेचारशे वर्षांपासून बीड शहराच्या मोमीनपुरा भागात असलेल्या ऐतिहासिक महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंती बांधून देण्याचा साधा उल्लेख ही केलेला नाही. हे दोन्ही प्रश्न आ. संदीप क्षीरसागर विसरले की, या दोन्ही प्रश्नांना जाणूनबुजून बगल देण्यात आली? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा