रमेशराव गंगाधरे, एस.एम.युसूफ़ यांनी नवनियुक्त मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना दिले निवेदन
रमेशराव गंगाधरे, एस.एम.युसूफ़ यांनी नवनियुक्त मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना दिले निवेदन
ऐतिहासिक कारंजा टॉवर चे परिपूर्ण नूतनीकरण करा
बीड नगर परिषदेतील वसुली विभागाचे स्थलांतर करा
बीड (एस.एम.न्युज़) - शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवर चे परिपूर्ण नूतनीकरण करावे तसेच बीड नगर परिषदेतील वसुली विभागाचे स्थलांतर करावे अशा मागण्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि एस.एम. न्यूज चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ केल्या आहेत.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवरचे परिपूर्ण नूतनीकरण करणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यात नागरिकांनी पुढे येत स्वतःहून खर्च करत ऐतिहासिक कारंजा टॉवर लगत सिमेंटचे बाकडे लावले, झाडे लावली, विद्युत मोटारी लावल्या, रंगबिरंगी लाइट्स लावल्या, पाण्याचे फवारे सुरू केले, कंपाउंड ला असलेल्या लोखंडी ग्रील ला रंगरंगोटी केली. तरीसुद्धा या ऐतिहासिक वास्तूचे परिपूर्ण नूतनीकरण करण्याकरिता अजूनही आवश्यक असलेली बारा कामे बाकी आहेत. या कामांची यादी मुख्याधिकारी यांना निवेदनातून देण्यात आली आहे. तसेच बीड नगर परिषदेतील वसुली विभाग तिसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर हलविण्यात यावे. कारण वसुली विभागात विविध कर भरण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांना खूप त्रास होतो आहे. यामुळे श्वासोच्छवास कमी-अधिक प्रमाणात झाल्यास नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. म्हणून नवनियुक्त मुख्याधिकारी यांनी या दोन्ही बाबींकडे स्वतः जातीने लक्ष देऊन ऐतिहासिक कारंजा टॉवर चे परिपूर्ण नुतनीकरण करण्यासाठी आवश्यक ते कार्य करावे तसेच बीड नगर परिषदेतील वसुली विभाग तिसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करावे अश्या मागण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा