Breaking News

नीता अंधारे यांच्या मागे परळी-आष्टीची अदृश्य शक्ती! - डॉ. गणेश ढवळे


नीता अंधारे यांच्या मागे परळी-आष्टीची अदृश्य शक्ती!
त्या पुन्हा परत बीड ला येऊ शकतात - डॉ. गणेश ढवळे

बीड (एस.एम.न्युज़) - नुकत्याच बदली झालेल्या बीड नगर परिषदेच्या वादग्रस्त तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे या बीड नगर परिषदेत बदली होऊन पुन्हा येऊ शकतात. त्यांच्या मागे परळी-आष्टी येथील अदृश्य शक्ती भक्कमपणे उभी असल्याचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना नमूद केले आहे की, नीता अंधारे यांनी त्यांच्या कार्यकाळात काय कामे केली? भ्रष्टाचार प्रकरणी पाठराखण केली. याविषयी वेगवेगळी मतमतांतरे असू शकतात. मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी बीडकरांचे प्रमुख वैशिष्ट्ये असणारे म्हणजे, भ्रष्टाचार विरोधात बोलु नका. अस्वच्छता, पाणीटंचाई याकडे पाहु नका आणि सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी कितीही आवाज उठवला तरी तो ऐकु नका, असे प्रतिक असणाऱ्या महात्मा गांधींजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृती पुन्हा स्थापित केल्या. बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बॅनर प्रकरणात गुन्हे दाखल केले. प्रथमच नाट्यगृह लिलावात निघाले तेव्हा चक्क एक कोटी रुपयांची थकबाकी देखील भरली. नीता अंधारे यांच्या निष्क्रियतेविषयी केवळ प्रसार माध्यमांनी एकाकी लढा दिला आणि शेवटचं म्हणजे नीता अंधारे यांची बदली आम्ही केली म्हणून कोणीही बढाया मारू नयेत. कारण नीता अंधारे यांच्या पाठीशी परळी आणि आष्टी मधील अदृश्य राजकीय शक्ती भक्कम असल्याने त्या कोणालाही जुमानत नव्हत्या. त्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे बदली झाली असुन बीडकरांची नाडी त्यांनी ओळखल्यामुळे त्या केव्हाही परत येऊ शकतात, असेही डॉ. गणेश ढवळे यांनी शेवटी नमूद केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत