एम.बी.बी.एस.एम.डी. डॉक्टर; तपासणी फी फक्त 5 रुपये; समाजात आता असे डॉक्टर विरळेच!
एम.बी.बी.एस.एम.डी. डॉक्टर; तपासणी फी फक्त 5 रुपये; समाजात आता असे डॉक्टर विरळेच!
कट्ट्यावर बसून एमबीबीएस एमडी डॉक्टर करतोय पाच रुपयात रुग्णांचा उपचार...
तरी दुसरीकडे चार पाच एमबीबीएस डॉक्टर ची सिंधीकेट गॅग करतीय रूग्णांची लुट - श्याम पिंपळे
भिंतीच्या कट्ट्यावर बसलेली व्यक्ती सामान्य कपडे परिधान करून, अनवाणी पाय, कागदाच्या तुकड्यावर काहीतरी लिहितो ज्याच्या कडे 3 रूपयांचा पेन आहे.
ती व्यक्ती आहे कर्नाटकातील मांदुआ येथील डॉ. शंकर गौडार कोलकाता मेडिकल युनिव्हर्सिटी चे गोल्ड मेडलिस्ट, एम.बी.बी.एस.एम.डी.
त्याच्याकडे स्वत: चा दवाखाना नाही. केबीन तयार करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. एवढा पैसा कुठून आणणार?
तो शहरापासून लांब दोन खोल्यांच्या घरात राहतो. रूग्ण उपचारासाठी इतके दूर कसे येतील, म्हणून दररोज तो सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत शहरात एका फास्ट फूड रेस्टॉरंटच्या बाहेर बसतो आणि शेकडो गरीब रूग्णांची तपासणी करतो. त्यांचे उत्तम निदान करतो व स्वस्त, जेनेरिक औषधे लिहून देतो.
तो किती शुल्क घेतो याची आपल्याला कल्पना आहे का? तो फक्त ५ रुपये घेतो. होय, फक्त ५ रुपये. गोल्डमेडलिस्ट एमडी पदवी असलेले हे डॉक्टर गरीब रूग्णांकडून फक्त ५ रुपये आकारतात.
आजच्या जगात जिथे डॉक्टर गरीब, सामान्य लोकांना अक्षरशः लुबाडत आहेत. तो अनेकांसाठी देव माणूस आहे.
आजच्या युगात वैद्यकीय सेवा म्हणजे नुसतीच सेवा राहिली नसून लाखो रुपयांचा धंदा झाला आहे. चार-पाच एमबीबीएस डॉक्टर एकत्र येऊन सिंधीकेट गॅंग तयार करतात. कर्ज घेऊन करोडो रुपयांची अत्याधुनिक हॉस्पिटल उभे करतात. ही हॉस्पिटल अनेक शहरांमध्ये मोठ्या थाटामध्ये उभी आहेत. अशा हॉस्पिटल मधून गोरगरिबांची लुट सुरु होते. अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांनी उपचारा अभावी, महागड्या गोळ्या-औषधे अभावी, दवाखान्याच्या फीस अभावी, सामान्य रुग्णांनी आपला जीव गमवल्याच्या घटना देशभरात घडत आहेत.
अशा युगात निशुल्क रुग्णांना सेवा देणारे उदात्त मानव डाॅ. शंकर गौडार मोफत रुग्ण सेवा करीत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक रुग्णसेवा वृत्तीला मानाचा मुजरा.....
लेखन तथा संकलन - *श्याम पिंपळे*
पुणे-बीड
संपर्क - *७८८७८२०५४०*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा