*बीडकर आणि पुरी भाजी* *- अनंत सुतनासे, एस.एम.युसूफ़*
*बीडकर आणि पुरी भाजी*
*- अनंत सुतनासे, एस.एम.युसूफ़*
बीडचा माणुस जगात कुठल्याही हॉटेल मध्ये गेला तर सकाळी न्याहरीसाठी पुरी भाजी पहिली पसंती असणार. इतर मित्र सोबत असतील तर ते इडली सांबर, डोसा, उत्तप्पा, पोहे वगैरे मागवतील पण पक्का बीडकर पुरीभाजीच मागवणार.
बरं ..हे इथेच थांबणार नाही ..पुरी भाजी सोबत भजी व कढी यायला हवीच. हे सर्व दिल्यावर तो जर कांदा विसरला तर त्याची गय नाही. आम्हा बीडकरांसाठी पुरी भाजी सकाळी जिव्हाळ्याचा व पर्वणीचा विषय
इतर जिल्ह्यापैकी वडा पाव मुबंईत, मिसळ पाव पुणे-नाशिक. पण न्याहरीला हॉटेल मध्ये खरा बीडकर जर गेला तर "पुरीभाजी" च प्रथम पसंती.
खरं तर हा मेनु बीडच्या हॉटेल मध्ये न्याहारी साठी केव्हापासून आला माहीत नाही पण मला जसे आठवते बशीरगंज बीड मध्ये *आपका* हॉटेल होते. तिथे प्रसिद्ध पुरी भाजी होती. वडिलांच्या सोबत लहानपणी मी अनेकदा खाल्ली होती, ते नेहमी सोबत घेऊन जायचे. त्या सोबत भजी व कढी हमखास असायची.
भाजी मध्ये भजी कुस्करून टाकायची व पुन्हा वेटरला
रस्सा मागवायचा हे कौशल्य वडिलांनीच शिकविले.
पुढे इतर हॉटेलस् ने ही भाजी चे कौशल्य माहिती घेऊन की काय हा प्रकार एक संस्कृती केला आणि आम्हां बीडकरांसाठी ही एक ओळख बनवली.
पुढे सिटी हॉटेलची, धोंडीपुरातल्या चंपावतीची, मोंढ्यातली, नवी भाजी मंडईतली, नगर रोडची, सावतामाळी चौकची आणि इतर हॉटेल मध्ये ही सकाळी विविध शैलीत तुम्हाला पुरीभाजी हमखास मिळणार तीही अगदी अल्पदरात व तनमयतेने.
अलीकडे पुरी भाजीच्या नाश्त्यासोबत भजी, कढी आणि पापड तर येतेच येते, शिवाय मसाला राईस सुद्धा दिला जातो. नवी भाजी मंडई रस्त्यावरील हॉटेल आशियानात तर सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हमखास पुरी भाजी भेटते.
गेल्या जवळपास ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या धोंडीपुरा येथील सराफ लाईनच्या कोपऱ्याला असलेल्या रईस हॉटेलमध्ये तर आजही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दर्जेदार पुरी भाजी मिळते. सकाळी चार तासात या हॉटेलमध्ये पुरी भाजी चे प्रेमी खवय्ये पुरी भाजीसाठी आपला नंबर कधी येतो याची सुद्धा वाट पाहत बसलेले दिसून येतात. आज एकीकडे पुरी भाजीसाठी अन्य हॉटेल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची ताटे वापरली जाताना, रईस हॉटेलमध्ये आजच्या काळात सुद्धा पुरी एका बशी मधे आणि दुसऱ्या बशीत भाजी दिली जाते. तरीसुद्धा पुरीभाजी खाणारे मोठ्या आवडीने येथील चविष्ट पुरी भाजी खातात. एकदा सकाळचे अकरा वाजून गेले की नंतर मात्र येथे पुरी भाजी भेटत नाही.
प्रख्यात लेखक "पु.लं.देशपांडे" एकदा म्हणाले होते, हॉटेल मध्ये पुरी ला हलवुन हलवुन तेल काढून पुरीभाजी खाण्यात जी मजा आहे ना, ती कश्यातच नाही.
हा अनुभव सकाळी नाश्त्याला फक्त बीड मधेच येतो.
बरं ...तुम्ही बीड मध्ये कुठे ही सकाळी सकाळी नाष्टा करा. तिथे इतक्या अदबीने पुरीभाजीची सेवा मिळते की, जणु तुम्ही जर हॉटेल मध्ये येणे सोडले तर हॉटेल बंद होईल. अगदी मिठा पासुन ते पापडा पर्यंत तुमची सेवा होईल. पुरी भाजी सोबत इतका पाहुणचार फक्त बीडकर व बीड मधेच.
संयुक्तलेखन - *अनंत सुतनासे* (निरक्षराचे शब्द ...),
*एस.एम.युसूफ़* (मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार)
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा