मुख्याधिकारी यांच्याकडून मनसेच्या आंदोलनाची दखल; आंदोलकांना दिले लेखी हमीपत्र
मुख्याधिकारी यांच्याकडून मनसेच्या आंदोलनाची दखल; आंदोलकांना दिले लेखी हमीपत्र
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस, कारंजा रोड,बलभीम चौक,जुना बाजार ते कोतवाली वेस पर्यंतच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगर परिषद कार्यालय बीड येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत नवनियुक्त मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी लवकरच रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे लिखित आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी सम्राट कदम यांच्याकडून आंदोलनकर्त्यांनी लेखी हमीपत्र स्वीकारले. यावेळी मनसेच्या वर्षा जगदाळे (महिला राज्य उपाध्यक्ष), आशा कुटे (महिला बीड जिल्हाध्यक्ष), सदाशिव बिडवे (जिल्हा उपाध्यक्ष), आकाश सुरवसे (सहकार सेना जिल्हाध्यक्ष), कल्पना कवठेकर (महिला जिल्हा उपाध्यक्ष), सुनिता सोनवणे, पठाण अमर जान (बीड शहराध्यक्ष), स्वराज मस्के सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा