स्वातंत्र्य दिनापूर्वी नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी गोरगरिबांसाठी केलेल्या आमरण उपोषणास यश
स्वातंत्र्य दिनापूर्वी नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी गोरगरिबांसाठी केलेल्या आमरण उपोषणास यश
गोरगरिबांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सर्व अधिकार्यांनी दिले लेखी पत्र
माजलगाव (एस.एम.न्युज़) - वंचित पात्र गोरगरीब गरजू नागरिकांना नवीन शिधापत्रिका पी एच एच मध्ये ऑनलाइन करून द्यावे व माजलगाव शहरात चांदणी ग्राऊंड परिसरात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर व उपलब्ध करून द्यावे यासह इतर मागण्यांसाठी माजलगाव तहसील समोर समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन मुस्ताक सिद्दीकी यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू करण्यात आले होते.
तहसीलदार रुहीकर यांच्या आदेशावरून पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार श्रीम. प्राची ठाकूर, तौर मॅडम व इतर अधिकाऱ्यांनी उपोषणातल्या सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन देत उपोषणापासून परावृत केले. यावेळी तहसीलचे काही कर्मचारी व समाजवादी पक्षाचे व इतर पक्षाचे काही कार्यकर्ते व वंचित लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन मुस्ताक सिद्दिकी यांनी केलेल्या या उपोषणात अमजद जिलानी खान पठाण, मोहसीन राज, आसेफ़ पटेल, सुनील जावळे, इनामदार नईम टेलर, अनिल साळवे, युवा नेते मुंजाभाऊ, शेख फारूक हेही सहभागी झाले होते.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा