चला बीडकरांनो, लोकप्रतिनिधींनी केलेला विकास पाहुया
चला बीडकरांनो, लोकप्रतिनिधींनी केलेला विकास पाहुया
****विकास केलाच नाही'.. मग आढावा कसला ?..."क्या विकास पागल हो चुका है" कहां गया ये विकास ?
**लोकप्रतिनिधींना बीड शहर बचाव मंचाचा संतप्त सवाल...
कोणी लोकप्रतिनिधी विकासाचे आढावे घेत फिरतोय. विकास केलाच नाही मग हे आढावेच कसले...? आम्हा जनतेला काही कळायला मार्ग नाही. विकासाचे आढावेच घ्यायचेआहेत ना तर या मग एकदा जमिनीवर, बीड शहराच्या गल्लोगल्ली लोकांच्या दारोदार एकदा फिराच... आढावा नक्कीच भेटेल. आढावा भेटेल तुमच्या सगळ्या क***** कर्तुतीचा, तुमच्या सगळ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीचा... विकास घरी झोप घेऊन स्वप्नात होत नसतो.. आजकाल विकास स्वप्नात तर येत नाहीये ना.. काय झाल आहे या विकासाला.. कुठे गेला आहै हा विकास.. लोकप्रतिनिधींच्या स्वप्नात तर जाऊ लागला नाही ना.... असं तर होत नाही ना रात्री स्वप्नात विकास केला आणि सकाळी उठून आढावे घेत फिरू लागले आहेत... अवघडच झाले आहे या विकासाचे... शोधूनही सापडत नाहीये... कहां गया है ये विकास'...? आज कल क्या करता है और कहा रहता है ये विकास..?? क्या विकास" सचमुच पागल हो चुका है.. मुझे सभी आवाम की तरफ से इन लोकप्रतिनिधींयो को पूछना है कि ये आढावे लेते वक्त, ये पागल हो चुका विकास" कहीं मिला क्या..?? हम सब को भी आके देखना है ये विकास होता कैसा है, दिखता कैसा है, रहता कहा पे है, जाता कहा पे है, और आता कहा से है और किसके किसके सपनो मे आता है...!
खरंचच आढावे घेणाऱ्यांना बीड शहर बचाव मंचाच्या वतीने व सर्व जनतेच्या वतीने एकच प्रश्न आहे कुठे गेला आहे हा विकास.. आढावे घेताना तरी सापडला का... काय खरंचच विकास पागल' झाला आहे.. सच मे विकास' पागल हो चुका है..? आढावे घेताना तरी हा कुठे भेटला का..? आढावे घेताना विकासाला भेटून तुम्ही जर धन्य झाला असाल तर आम्हालाही सांगा.. त्याची भेट घ्यायची आहे आणि आम्हालाही धन्य व्हायचे आहे.
जे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करून, व फक्त दिशाभूल करण्यासाठीच विकासाचे आढावे घेत फिरत आहेत त्या सगळ्यांना माझे सर्व जनतेच्या वतीने एकच आव्हान आहे की लोकांच्या दारोदारी, या शहरामध्ये गल्लोगल्ली फिरा आणि विकासाचा आढावाच घ्या. सर्व जनता आढावा देण्यासाठी डोळ्यात तेल' घालून तुमची वाट पाहत आहे. मग तुम्हाला नक्कीच कळेल विकास' क्यूं पागल हो रहा है.... एकदा आढावा घ्यायला याच.. आणि होऊन जाऊ द्या दुधाचे दूध पाण्याचे पाणी .. किती खरं आणि किती खोटं .. होऊन जाऊ द्या एकदा जनतेच्या दरबारात आमने-सामने विकास' कुठे आहे..??
आढावा घेत फिरणाऱ्या लोकप्रतिनिधीने हा विकास कुठे व कधी केला होता हे आपल्या सगळ्यांना बघायला जायचे आहे मग येणार ना सगळेजण विकास' पाहायला..??
*- बीड शहर बचाव मंच*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा