Breaking News

भूरभूर पावसामुळे कचरा सडून शहरात पसरू लागली दुर्गंधी नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यास जपणे आवश्यक

भूरभूर पावसामुळे कचरा सडून शहरात पसरू लागली दुर्गंधी


भूरभूर पावसामुळे कचरा सडून शहरात पसरू लागली दुर्गंधी

नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यास जपणे आवश्यक

बीड (एस.एम.न्युज़) - शहर स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराचे गेल्या चार महिन्यापासून बिल थकले आहे. चार महिन्याचे बिल मिळाले नसल्याने कचरा उचलणारी कंत्राटदाराची यंत्रणा ठप्प आहे. जाचक अटींमुळे नवीन कंत्राटदार ही निविदा घेण्यासाठी फिरकत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या भूरभूर पावसामुळे कचरा सडून शहरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. याचा परिणाम लहान मुलांसह वयस्क आणि वयोवृद्धांवर सुद्धा होऊ शकतो. रोगराई पसरू शकते यामुळे बीड नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी पदावर नुकतेच रुजू झालेल्या शैलेश फडसे यांनी वेळीच पावले उचलून प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.
शहरातील ५१ वॉर्डात दिवसाला ७२ टन कचरा निघतो. त्याच्या संकलनासाठी मोठ्या फौजफाटेसह यंत्रणा लागते. यासाठी मासिक खर्च ४० लाखांवर आहे. तब्बल चार महिने बील थकले तरीही काम सुरूच ठेवा, अशी अट पालिकेने काढलेल्या निविदेत ठेवली आहे. बीड पालिकेने ३ वेळा स्वच्छतेचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रसिध्द केली. मात्र, आतापर्यंत केवळ २ कंत्राटदारांनी निविदा भरल्या आहेत. किमान ३ निविदा येणे गरजेचे आहे. बीड पालिकेने पूर्वीच्या स्वच्छतेच्या कंत्राटदाराचे बील थकवल्याने आणि ४ महिने पालिकेने निधी दिला नाही, तरी कंत्राटदाराने काम बंद करू नये, या अटीमुळे राज्यातील कंत्राटदाराने बीड पालिकेच्या टेंडरकडे पाठ फिरवली. २ वर्षांपासून स्वच्छतेचे टेंडर न झाल्याने शहरातील ७२ हजार प्रॉपर्टीचा ७२ टन कचरा संकलन करण्यासाठी पालिकेकडे यंत्रणाच नाही. २ वर्षांपासून बीडमध्ये कचऱ्याचा प्रश्न पालिकेला सुटलेला नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार डीपीडीसीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देतील का? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होऊ लागला आहे. १४ व्या वित्त आयोगात पालिकेला दोन टप्यांत ३० कोटींच्या पुढे निधी मिळत होता. १५ व्या वित्त आयोगात शासनाने यामध्ये बदल केल्याने आता पालिकेला २ कोटीही निधी मिळत नाही. त्यातील एक टप्पा अजूनही आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पालिकेला निधी मिळत नसल्याने ३ वेळा निविदा प्रसिध्द करूनही कंत्राटदार का मिळेना. घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध नसल्याने राज्यातील कंत्राटदार टेंडरसाठी इच्छुक नाहीत. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बीड नगर परिषद पुढे काय करणार? बीड नगर परिषद कडून कचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत बीड नगर परिषदेकडून तात्पुरती काही व्यवस्था करण्यात येणार का? असे प्रश्न शहरातील कचरा समस्येमुळे उपस्थित होऊ लागले आहेत.

*मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडून अपेक्षा!*


नुकतीच बीड नगर परिषदेत मुख्याधिकारी पदी शैलेश फडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन अधिकारी आल्यावर त्यांना शहरासाठी आवश्यक असलेले कार्य समजण्याकरिता काही कालावधी जावा लागतो. आणि समजल्यावर ते आपल्या पद्धतीने कार्य करतात परंतु बीड शहराची एवढी बकाल आणि वाईट अवस्था झालेली आहे की, ती समजून घेताना कुणीही नवीन मुख्याधिकारी आला तरी त्याच्या नाकी नऊ येणार आहेत. अशा अवस्थेमध्ये आता नवनियुक्त मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे बीड शहरवासियांचे लक्ष लागले असून ते शहराची अवस्था निश्चितपणे सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत