जमीयत उलेमा-ए-हिंदच्या तालुकाध्यक्षपदी असद कुरेशी यांची फेरनिवड
जमीयत उलेमा-ए-हिंदच्या तालुकाध्यक्षपदी असद कुरेशी यांची फेरनिवड
धारूर (एस.एम.न्युज़) - जमीयत उलेमा-ए-हिंदच्या धारूर तालुकाध्यक्षपदी असद कुरेशी यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.
धारूर तालुक्यातील जमीयत उलेमा-ए-हिंदच्या निवडणूक बैठकीत असद कुरेशी यांनाच पुन्हा धारूर तालुकाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यामुळे धारूर तालुक्यात जमीयतच्या कार्याला नवे बळ आणि दिशा मिळणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी जमीयत उलेमा-ए-हिंद बीड जिल्हाध्यक्ष मौलाना मुफ्ती अब्दुल्ला, बीड जिल्हा जनरल सेक्रेटरी मौलाना साबीर तसेच तालुक्यातील विविध गावांतील जबाबदार कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
फेरनिवडीनंतर असद कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, जमीयत उलेमा-ए-हिंदच्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणार आहे. माझ्यावर पुन्हा दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. संघटनेच्या माध्यमातून मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडीन आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
त्यांच्या या भाषणानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा