इस्लामपुरातील दोन पुलांची दैनावस्था! अत्तार समाजाची मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे धाव
इस्लामपुरातील दोन पुलांची दैनावस्था!
अत्तार समाजाची मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे धाव
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील इस्लामपुरा भागात राजू बेकरी व पाशा अत्तार यांच्या घराजवळ पूलांची दैनावस्था झाल्याने येथील दोन्ही पूल बांधण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी बीड नगर परिषद चे नवनियुक्त मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले.
शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील राजू बेकरी व पाशा अत्तार यांच्या घराजवळ पूल नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अत्तार फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य, जिल्हा बीड यांच्या वतीने मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना निवेदन देण्यात आले.
याविषयी निवेदनात म्हटले आहे की, येथील दोन्ही पूल तुटल्याने पावसाळ्यात रस्ता बंद होतो आणि पाणी साचल्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक व महिलांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो. पूल नसल्यामुळे दळणवळण खंडित होते, अपघाताची शक्यता वाढते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे हा रस्ता हज़रत शहिंशाह वली दर्गाह ते गोशानशीन दर्गाह या महत्त्वाच्या मार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
अत्तार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इम्रान अत्तार यांनी सांगितले की, या भागातील नागरिकांना वर्षानुवर्षे पूल नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषदेने तातडीने पूल बांधण्याची कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांनीही या मागणीस समर्थन दर्शवले असून लवकरात लवकर काम सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदन देताना अत्तार फाऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष इम्रान अत्तार, अत्तार वेल्फेअर ट्रस्ट चे जिल्हा सचिव अकबर अत्तार, परवेज अत्तार, आदिल अत्तार, कासीम अत्तार, रफीक अत्तार, फिरोज अत्तार, समीर अत्तार, मुख्तार अत्तार आदी उपस्थित होते.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा