ना समाजसेवक तुझसा तेरे बाद आया, इफ़्तेख़ार ज़की बाबा तू बहुत याद आया!
ना समाजसेवक तुझसा तेरे बाद आया, इफ़्तेख़ार ज़की बाबा तू बहुत याद आया!
समाजसेवक इफ़्तेख़ार ज़की बाबा सोशल अँड वेल्फेअर फाउंडेशन माजलगाव तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
३८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान, ४० मुस्लिम महिलांचाही समावेश
माजलगाव (एस.एम.न्युज़) - समाज सेवक इफ़्तेख़ार ज़की बाबा फाउंडेशन माजलगाव च्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ३८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात कधी नव्हे ते प्रथमच ४० मुस्लिम महिलांनी सुद्धा रक्तदान केल्याने ज्यांच्या नावाने हे रक्तदान केले गेले त्या इफ़्तेख़ार ज़की बाबांसाठी मरणोपरांत "ना समाजसेवक तुझसा तेरे बाद आया, इफ़्तेख़ार ज़की बाबा तू बहुत याद आया" या ओळी सहजच मनात येत होत्या.
स्वातंत्र्याच्या ७९ व्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जमात ए इस्लामी हिंद व समाज सेवक इफ़्तेख़ार ज़की बाबा सोशल अँड वेल्फेअर फाउंडेशन माजलगाव च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीर मध्ये तब्बल ३८३ रक्तदात्यांनी रक्तदान करून भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
*मरावे परी कीर्ती रुपी उरावे!*
फक्त माजलगाव तालुकाच नाही तर बीड जिल्ह्यासह गल्ली ते दिल्ली अशाप्रकारे आपल्या कार्यकर्तृत्वाने ओळख निर्माण केलेले मरहूम इफ़्तेख़ार ज़की बाबा यांना काळाने अनपेक्षितरित्या कोरोना काळात आपल्यातून हिरावून नेले. ते हयात असेपर्यंत प्रत्येक अडल्या-नडलेल्यांसाठी, सर्वसामान्यांपासून ते प्रत्येक गरजवंतासाठी सतत अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने काम करत होते. त्यांचे व्यक्तिमत्व पाहिल्यावर एखादा राजकुमार किंवा चित्रपटातील नायक सुद्धा खुज़ा वाटायचा. त्यावर अल्लाहने त्यांना आवाज आणि वाणी अशी दमदार दिली होती की त्यांच्या तोंडून निघालेले प्रत्येक वाक्य ऐकतच राहावे असे वाटे. असे आकर्षक व्यक्तिमत्व अल्लाहने त्यांना दिले होते. शिवाय त्यांचे कार्यकर्तत्व असे होते की, ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटायचे. नेहमी असे म्हटले जाते की "जो आवडे सर्वांना, तो आवडे अल्लाह ला". म्हणूनच की काय अल्लाहने त्यांना अवघ्या पन्नाशीच्या आत आपल्यातून हिरावून नेले. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या हयातीत केलेली कामे त्यांच्या मरणोपरांतही थांबू नये याकरिता त्यांच्या पश्चात समाजसेवक इफ़्तेख़ार ज़की बाबा सोशल अँड वेल्फेअर फाउंडेशन माजलगावात निष्पक्ष व निस्वार्थपणे काम करत आहे. आजपर्यंत शंभरहुन अधिक कॅन्सर, हृदयरोग असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार करुन आणले आहेत. सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सदैव पुढाकार घेतले जात आहे. हे कार्य पाहता ज़की बाबा बद्दल "मरावे परी कीर्ती रुपी उरावे" ही म्हण तंतोतंत खरी ठरत आहे.*जमात ए इस्लामी हिंद च्या महिला विंग ने रचला इतिहास*
यावेळी रक्तदान शिबीरात जमात ए इस्लामी हिंद च्या महिला विंग ने सहभाग घेतला. चक्क ४० मुस्लिम महिलांनी पुढाकार घेत रक्तदान करत इतिहासच रचला. हे रक्तदान शिबीर सफा टॉवर, आंबेडकर चौकात घेण्यात आले.*आ. प्रकाश सोळंके यांनी ज़की बाबांच्या कार्यावर प्रकाश टाकला*
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रकाश सोळंके याच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात ज़की बाबांनी केलेल्या सामाजिक कामांवर प्रकाश टाकला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मोहन जगताप होते. इरफान मिर्जा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेख शौकत यांनी आपल्या अध्यक्षतेखाली फाउंडेशनने गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा लेखाजोखा सविस्तरपणे मांडला. जमात ए इस्लामी हिंद चे तालुकाध्यक्ष माजेद खान यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी काही प्रमुख उपस्थितांनी आपले मत व्यक्त करत फांडेशन चे कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख शाहेद मनियार, शेख सलीम जरगर, शेख जमीर, सय्यद ख़ैसर, शेख असद, सय्यद सत्तार, हबीब सिद्दीकी, मारुफ इनामदार, नाजेर, रायस चाउस, जुल्फिकार यावर, अज्जू, ग़जमफर, सुमेर पटेल, आसीफ, इमरान खान, मुफ़्ती शब्बीर,अहेमद, शफीक, शुजाअत मिर्ज़ा आदींनी कठोर परिश्रम घेतले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा