Breaking News

एमएससी एम्ब्रियोलॉजी मध्ये शेख ज़ाफ़र सुलतान विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण

एमएससी एम्ब्रियोलॉजी मध्ये शेख ज़ाफ़र सुलतान विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण

आई-वडिलांच्या परिश्रमाचे सार्थक केले - एस.एम.युसूफ़

एस.एम.न्युज़ परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
बीड (एस.एम.न्युज़) - वैद्यकीय क्षेत्रातील एम.एस.सी. एम्ब्रियोलॉजी च्या अंतिम वर्षात शेख ज़ाफ़र सुलतान ने विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण होत त्याच्या बॅच मधून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे त्याने त्याच्या शिक्षणासाठी अविश्रांत परिश्रम घेतलेल्या आई-वडिलांच्या परिश्रमाचे सार्थक केले असे भावनिक मत त्याचे मामा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.
शेख ज़ाफ़र सुलतान प्राथमिक शिक्षणापासून ते एम.एस.सी. एम्ब्रियोलॉजी पर्यंतच्या शिक्षणात नेहमी विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण होत आला आहे. मग ते दहावी-बारावी बोर्डच्या परीक्षा असो की अन्य कोणत्याही परीक्षा. प्रत्येक परीक्षेत त्याने विशेष प्राविण्य कधी सोडले नाही. अशाच प्रकारे यंदाही एम.एस.सी. एम्ब्रियोलॉजी चे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड रिसर्च नागपूर येथे शिक्षण घेत अंतिम वर्षात त्याच्या बॅच मधून पहिला आला आहे. त्याने ७०० पैकी ५६५ गुण मिळविले आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे त्याने आतापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचे आणि आई-वडिलांच्या परिश्रमाचे सार्थक करून उत्कृष्टरित्या एम.एस.सी. एम्ब्रियोलॉजिस्ट (भ्रूण शास्त्रज्ञ) झाला आहे. सध्या समर्थ हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी अँड आईवीएफ सेंटर गोंदिया या ठिकाणी स्वतंत्ररित्या काम पाहत आहे. असे त्यांचे मामा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे. या यशाबद्दल एस.एम.न्युज़ परिवाराकडून शेख ज़ाफ़र चे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत