Breaking News

नंदकिशोर धकिते निर्मित,अल्ताफ शेख दिग्दर्शित 'ऍट पोस्ट बिहाली' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

 

नंदकिशोर धकिते निर्मित,अल्ताफ शेख दिग्दर्शित 'ऍट पोस्ट बिहाली' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

बीड (एस.एम.न्युज़) - सुप्रसिद्ध चित्रपट कर्मयोगी आबासाहेब चे लेखक, दिग्दर्शक, बीड जिल्ह्याचे जावई, सोलापूरचे भूमिपुत्र आणि सध्या पुणे शहरात स्थायिक असलेले अल्ताफ दादासाहेब शेख यांनी दिग्दर्शित केलेला ऍट पोस्ट बिहाली हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून नुकतेच अमरावती येथे या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत करण्यात आले.
बीएसएफ बहुउद्देशीय संस्था, उपेक्षित नायक न्युज, संत कबीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था बुलढाणा यांच्या वतीने यश पॅलेस अमरावती येथे 'समाज क्रांती' पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड बुक आणि गिनिज बुक रेकॉर्ड विजेते लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित व स्मिता धकिते आणि नंदकिशोर धकिते निर्मित 'ऍट पोस्ट बिहाली' या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. लवकरच हिंदी आणि मराठी भाषेतून संपूर्ण जगभरात चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. फिल्म इंडस्ट्री तसेच मीडिया आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना 'समाज क्रांती' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अमजदखान, शेख, विशाल धेंडे, प्रॉडक्शन मॅनेजर गणेश गोरे, प्रोडक्शन कंट्रोल सफर शेख, अली शेख, अभिनेत्री कांचन शिरबे   तसेच चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, पत्रकार इत्यादी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.भुषण सरदार, रॉयल सरदार यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सांगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत