Breaking News

तहसीलदार - नायब तहसीलदार संघटना ॲक्शन मोडमध्ये!

तहसीलदार - नायब तहसीलदार संघटना ॲक्शन मोडमध्ये!


तहसीलदार प्रशांत थोरात प्रकरणी संघटनेचे मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना निवेदन

बीड (एस.एम.न्युज़) - उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर झालेल्या एकतर्फी निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठवण्यात आले. त्यात महसूल विभागाशी संबंधित अनेक  मुद्दे अधोरेखित करण्यात आले.
संघटनेने निवेदनात नमूद केले की, प्रशांत थोरात यांची कोणतीही सखोल चौकशी न करता, म्हणणे मांडण्याची संधी न देता एकतर्फी निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई न्यायाच्या तत्त्वांना धरून नसल्याचे सांगून तिचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती उघड करावी आणि थोरात यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. निरोप समारंभ कार्यक्रमात गाणे म्हटले या कारणास्तव नुकतेच उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे.
संघटनेने पुढे स्पष्ट केले आहे की, तहसीलदार हे शासनाच्या कामकाजातील सर्वात महत्वाचे घटक असून त्यांच्या जबाबदाऱ्या व्यापक आहेत. महसूल विभागाचे नियंत्रण ठेवणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदत करणे, टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्याची देखरेख करणे, गावठाण वाढीची प्रकरणे तयार करणे, रोजगार हमी योजनांची तपासणी करणे, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण दूर करणे, खाणी व खनिजे यावरील शासनाचे हक्क जपणे, पाणी परवाना देणे, महसूल वसूली करणे, जमीनवाटप, कूळ हक्क ठरविणे, पिक पाहणी करणे, शेतकरी-खातेदारांच्या तक्रारींचे निवारण करणे तसेच तालुक्यातील सर्व सरकारी विभागांमध्ये समन्वय राखणे अशी अनेक महत्त्वाची कार्ये तहसीलदारांकडे असतात.
याशिवाय संजय गांधी योजना, लाडकी बहीण योजना, महाराजस्व अभियान, महसूल सप्ताह, शेतकरी आत्महत्या प्रस्ताव, जन्म-मृत्यू आदेश, विविध प्रमाणपत्रे, सेतू केंद्र, स्वस्त धान्य दुकाने, गोडाऊन तपासणी, परीक्षा नियोजन अशा शेकडो कामकाजाची जबाबदारी तहसीलदारांकडे असते. त्यामुळे कामाचा व्याप प्रचंड असून अनावधानाने एखादी किरकोळ चूक घडली तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांना मोठी व कठोर शिक्षा देणे योग्य ठरत नाही, असा निवेदनाचा रोख आहे.
या प्रसंगी बीडचे अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, तहसीलदार तेजस्विनी जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, तहसीलदार डी.सी.मेंडके, नायब तहसीलदार धनंजय काळे, आर.आर.बोठे, सुधाकर टाक व श्रीमती एन.एन.उगलमुगले हे उपस्थित होते.
संघटनेने शासनाला आवाहन केले की, महसूल विभागातील अधिकाऱ्यांना न्याय्य व सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून द्यावा, प्रशांत थोरात यांच्या प्रकरणाची चौकशी करून त्यांना न्याय मिळवून दिला नाही तर राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होईल. अशी स्पष्ट भूमिका संघटनेने मांडली आहे.
राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, कोषाध्यक्ष राहुल मुंडके, सहसचिव बाळासाहेब वाकचौरे तसेच उपाध्यक्ष आर.जे.पाटील, डी.एस.कुंभार, पंकज पवार, प्रवीण ठाकरे, किरण आंबेकर, सहसचिव पवन चांडक, शिवाजी शिंदे, शशिकांत मंगरुळे, संजय खडसे, विद्याचरण कडवकर, राजीव सक्करवार हे शासनाकडे पाठपुरावा करून महसूल अधिकाऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाबद्दल दाद मागणार असल्याचे समजले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत