मिल्लिया प्राथमिक उर्दू शाळा मुलींची (भालदार पुरा) ने राबविला अभिनव उपक्रम
मिल्लिया प्राथमिक उर्दू शाळा मुलींची (भालदार पुरा) ने राबविला अभिनव उपक्रम
'एक पेड माँ के नाम' प्रमाणपत्राचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांच्या हस्ते वाटप
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील भालदार पुरा येथे असलेल्या मिल्लिया मुलींची उर्दू प्राथमिक शाळेत 'एक पेड माँ के नाम' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी समंदर खान, केंद्र प्रमुख मनियार हकीम यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या आईंसोबत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शासनाच्या 'एक पेड माँ के नाम अंतर्गत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आईंसोबत मिळून आपल्या परिसरात, शाळेत झाडे लावली. त्याचे फोटो लिंक मध्ये अपलोड करत वृक्षारोपण मध्ये सक्रिय सहभाग घेतला. नंतर याची ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त झाली. त्या प्रमाणपत्राच्या वाटपाचा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. यावेळी शाळेतही वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम राबविल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी समंदर खान पठाण आणि केंद्रप्रमुख हकीम मणियार यांनी शाळेचे कौतुक केले.
शासनाचा 'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम संस्थेच्या सचिव खान सबिहा बेगम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका मिर्झा कनिज़ फातेमा आणि पर्यवेक्षिका रिज़वाना बेगम कादरी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे ज्ञानवर्धक व उत्कृष्ट सूत्रसंचालन नजमुसहेर बाजी, मसरत सुलताना बाजी आणि सबीया खतीब बाजी या सहशिक्षिकांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजरा बाजी, फैसल सर, शाज़ीया बाजी, निशात बाजी, सना बाजी, अरशीया बाजी, तसलीम बाजी, सबा फातेमा बाजी, सबा अंजुम बाजी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा