ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांचा भव्य नागरी सत्कार
ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांचा भव्य नागरी सत्कार
सत्काराला उपस्थित राहण्याचे मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन
बीड (एस.एम.न्युज़) - दैनिक सुराज्य चे ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर अण्णा यांना मराठी पत्रकार परिषदेचा नागोजीराव दुधगावकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जालना रोडवरील हॉटेल अन्वीता येथे पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्यासह सर्व सन्माननीय संपादक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे माजी विभागीय सचिव दिलीप खिस्ती, विभागीय सचिव रवी उबाळे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे, राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय आरबुणे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय हंगे, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर, जिल्हा समन्वयक अभिमान्यु घरत, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत राजहंस, सचिन पवार, अविनाश कदम, जुनेद बागवान, दिलीप झगडे, संजय रानभरे, गौतम बचुटे, कादर मकरानी, तालुका अध्यक्ष दत्ता आजबे, मधुकर तौर, जालिंदर नन्नवरे, अजय जोशी, हरीश यादव, विजय आरकडे, सतीश सोनवणे, प्रशांत लाटकर आदींनी केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा