Breaking News

बीड जिल्ह्यातील रिक्षाचालक झोपेत! कल्याणकारी मंडळासाठी तीन हजार पैकी केवळ सात जणांची नोंदणी

बीड जिल्ह्यातील रिक्षाचालक झोपेत!

कल्याणकारी मंडळासाठी तीन हजार पैकी केवळ सात जणांची नोंदणी

बीड (एस.एम.न्युज़) राज्यातील ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी गतवर्षी जुलैपासून धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्यामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा रिक्षा चालकांना लाभ मिळतो. बीड जिल्ह्यात रिक्षाचालकांची संख्या तीन हजारांवर असताना केवळ ७ रिक्षा चालकांनीच नोंदणी केली आहे.
राज्यातील परिवहन विभागांतर्गत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी शासनाकडून एकवेळचे अनुदान ५० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली आहे. या कल्याणकारी मंडळांतर्गत जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत.

*लाभ मिळण्याची प्रक्रिया*
महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या लाभासाठी चालकांनी जिल्हा कार्यालयामध्ये विहीत नमुन्यात अर्ज करावा. प्रत्येक अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून त्यांना दिलेल्या निकषानुसार पात्रतेसाठी तपासले जाईल. मंजूर लाभ राज्यस्तरीय मंडळाने व जिल्हास्तरीय समितीने वेळोवेळी विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार वितरीत केले जातील.

*नोंदणीकृत मंडळ*
महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ हे या नावाने नोंदणीकृत असून, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत हे मंडळ कार्यरत आहे. या मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नोंदणीकृत मंडळ हे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मंडळ आहे.

*असे आहे कार्य*
जिल्हा समितीमार्फत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी योजना राबविणे, लाभार्थी म्हणून ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी चालक नोंदणी करणे, जिल्हा समितीचे सदस्य, सचिव हे पात्र लाभधारकांच्या यादीस मान्यता घेऊन लाभ देतील.

*लाभ मिळण्याची प्रक्रिया*
महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या लाभासाठी चालकांनी जिल्हा कार्यालयामध्ये विहीत नमुन्यात अर्ज करावा. प्रत्येक अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून त्यांना दिलेल्या निकषानुसार पात्रतेसाठी तपासले जाईल. मंजूर लाभ राज्यस्तरीय मंडळाने व जिल्हास्तरीय समितीने वेळोवेळी विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार वितरीत केले जातील.

*असे मिळतील लाभ*
जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, ६५ वर्षांवरील ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज, राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना तसेच शासनाने निर्देशित केलेल्या इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.

*साभार - सायं. दैनिक दिव्य वार्ता*

===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत