Breaking News

महावितरण कंपनीने एकाच दिवसात १६० आकडे बहाद्दरांवर केली कारवाई

महावितरण कंपनीने एकाच दिवसात १६० आकडे बहाद्दरांवर केली कारवाई

बीड विभागाकडून आकडे मुक्तीची मोहीम जोरात
बीड (एस.एम.न्युज़) - वीजहानी कमी करण्याच्या दृष्टिने अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात गुरूवारी (दि.२१) राबविलेल्या विशेष महामोहीमेत महावितरणच्या बीड विभागातील सर्व उपविभागाच्या वीजचोरी बहूल भागात राबविलेल्या धडक कारवाईत तब्बल १६० आकडे बहाद्दरांना महावितरणने चांगलाच दणका दिला आहे. दिवसभर झालेल्या या कारवाईत आकडे टाकून वापरण्यात आलेल्या शेगडया, हीटर व केबल जप्त करण्यात आले.
नियमीत वीजबील भरणाऱ्या वीजग्राहकांना अखंडीत व योग्यदाबाचा वीजपुरवठा व्हावा या उद्देशाने सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड विभागाचे  कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांनी धडक मोहीम हाती घेतली असून जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचे सर्व उपविभागांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार गुरूवारी (दि.२१) राबविलेल्या धडक कारवाईत विभागातील आकडे टाकून वीजवापरणाऱ्यांवर कारवाई करत आकडे मुक्त परिसर मोहिम राबविण्यात आली. या धडक मोहिमेत बीड शहर  उपविभागातील संशयास्पद अशा ३५, बीड ग्रामीण उपविभागातील २४, गेवराई उपविभागातील ७२, आष्टी उपविभागातील २१ तर पाटोदा उपविभागातील ०८ वीजग्राहक आकडे टाकून वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. यासर्व वीजचोरांवरती वीजकायदा २००३ अनुसार कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली. वीजचोरीच्या बिलाची व दंडाची बीले तयार करून देण्याची कारवाई सुरू असून दिलेली बिले न भरल्यास वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या धडक कारवाईत कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांच्यासह बीड विभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यापुढेही वीजचोरी विरोधातील मोहीम अधिक कडक स्वरूपात राबवली जाणार असून वीज कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

वीजचोरी करणे हा दंडात्मक गुन्हा असून महावितरण मागेल त्याला वीजपुरवठा देण्यास बांधील आहे. आकडे टाकून वीजवापरताना जीवघेणी दुर्घटनाही होवू शकते त्यामुळे  नागरिकांनी अधिकृतरित्याच वीज वापरावी. बीड विभाग हा आकडेमुक्त विभाग म्हणून ओळखला जावा यादृष्टीने यापुढेही वीजचोरी विरोधात आक्रमक कारवाईची मोहीम राबवली जाईल.
*– सुबोध डोंगरे*
कार्यकारी अभियंता, बीड विभाग.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत