Breaking News

प्रजा इथं अन् राजा तिथं - रूपाली देशपांडे


अजित दादा बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले, आता बाप म्हणून बीड जिल्ह्याकडे लक्ष द्या - रूपाली देशपांडे

बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यासाठी प्रजा इथं अन् राजा तिथं अशी अवस्था झाल्याने बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादांनी आता बाप म्हणून बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे असे रोखठोक मत सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका रूपाली देशपांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड चे इथे सर्व परीने हाल चालू आहेत. पिण्याला पाणी नाही. दुष्काळ ग्रस्त म्हणून म्हणून आमचे हाल असेच राहणार का? पाणी नाही, बीड शहराची स्वच्छता कोलमडून पडली आहे. रस्त्यांवर लाईट नाहीत. नगर पालिका झोपलेली आहे. निवेदने दिली तरी ऑफिस च्या टेबलावर कागदाचा गठा जमा होत आहे. पण कसलाच काही ताळमेळ नाही. पाणी नियोजन नाही. पाण्याची सोय व्यवस्थित लावली असती तर आज माझ्या आया बहिणी हंडे घेऊन भटकल्या नसत्या. ग्रामीण भागातील माझ्या बहिणी मैल दर मैल रस्ते तुडवत गेल्या नसत्या. छोटे छोटे लेकरं सुद्धा पाणी मिळविण्यासाठी आज उन्हात उभा राहिले नसते. पिण्याच्या पाण्यापासून ते सांडपाण्यापर्यंत घरातील बाईला नियोजन लावावे लागते. पण बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी असलेल्या अंधारे बाईंकडे नियोजन चा पत्ता नाही. अजितदादा तुम्ही बीडला या. सामान्य लोकांसारखी बीड मध्ये निदान पायी एक चक्कर मारा आणि पहा किती दुर्लक्षित आहे हे बीड. दादा तुम्ही आमच्या बीड जिल्ह्याचे पालक आहात. आमच्यासाठी हि खूप चांगली आनंदाची बाब आहे. आम्ही विश्वास टाकतोय तुमच्यावर. दादा इथे होणारे वाढते गुन्हे, बायकांवर होणारे अत्याचार, अनेक मोठे गुन्हे, वाढत्या आत्महत्या या सर्वांना कुठे तरी आळा बसायलाच हवा. येथील शासकीय आणि प्रशाकीय गोष्टी आता तुम्हीच हाताळा. पालकमंत्री झाल्यापासून दादा तुम्ही एकच चक्कर मारली. बीड जिल्ह्याला न्याय द्या. बीडचा ही विकास होऊ द्या जरा. मागील काही पालकमंत्री, आमदार, खासदार सगळे होऊन गेले. त्यांनी बीडचा विकास होऊ न देता स्वतःचा मात्र भरभक्कम विकास करून घेतला. विकास केला असता तर आज आम्ही पाण्यासाठी, मूलभूत गरजा भागविण्यासाठी वणवण हिंडलो नसतो. दादा आता तुम्हीच आम्हा बीड जिल्हावासियांना न्याय द्या. बीडच्या विकासाचे पारडे जड करा असे भावनिक आवाहन ही रूपाली देशपांडे यांनी पालकमंत्र्यांना केले आहे.

=====================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

👇👇👇👇👇👇👇

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

👇संपर्क👇

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत