बीड नगर पालिका मुकी, आंधळी, बहिरी झाली का? - रूपाली देशपांडे
बीड नगर पालिका मुकी, आंधळी, बहिरी झाली का? - रूपाली देशपांडे
बीड (एस.एम.न्युज़) - बीड नगर पालिका आता बहिरी, आंधळी आणि मुकी झाली का असा उद्विक प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तथा स्तंभ लेखिका रूपाली देशपांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, वरील प्रश्न बीड शहरात राहणाऱ्या जनतेच्या डोक्यात सातत्याने येत आहे. कारण कित्येकांनी आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी अर्ज केली, निवेदन दिले, आंदोलने केली. तरीही बीड नगर पालिकेला आणि पालिकेतील मॅडमला काही फरक पडत नाही. बीड शहरात कित्येक पटीने वाढलेले कचऱ्याचे ढीग, नळपट्टी भरून हि वर्षात फक्त १२ वेळेसच पाणी येणारे काही प्रभाग आहेत. बऱ्याच रस्त्यांवर रात्रीचे दिवे बंद आहेत आणि काही ठिकाणी मात्र लाईट चे दिवेच नाहीत. यामुळे नीता अंधारे मॅडमना विनंती ही केली आहे की, तुम्ही ज्या प्रकारे बीड नगर पालिकेत बसलात ना, तर मग एक चक्कर बीड शहरात मारा आणि पहा किती दूर्दशा झाली आहे. पाण्याच्या नियोजनासाठी उन्हाळा लागण्याअगोदर पाण्याचा बंदोबस्त केला असता तर आज लोकांचे हाल झाले नसते. कंबरे इतके कचऱ्याचे ढीग आता कधी उचलणार? रात्री अंधारात अर्धे बीडचे रस्ते बंद असतात. पालिकेत नाही पण इथे तरी दिवे लावा तुमचे. बीड नगर परिषदेत तुमची जी खुर्ची आहे, त्या खुर्चीची जबाबदारी लक्षात घ्या. रस्ते वर्षानुवर्षे झाडत नाही. त्याचे कारण विचारले तर झाडू कामगारांचे पैसे दिले नाही म्हणून आले नाही असे समजले. मग सांगा येणारा पैसा कुठे गेला. सर्वसामान्य माणसाला हे विचारण्याचा अधिकार आहे. त्यांचे पगार होत नाही म्हणून ते येत नाहीत. पण तुम्ही कामे करीत नसूनही वर्षानुवर्षे तुमचे पगार मात्र चालू असतात. तेच बंद झाले तर कदाचित अश्या सर्व अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव होईल. आता अजून हि वेळ गेली नाही. पाणी समस्येवर ठोस व पक्के काही उपाय करता येऊ शकते. आज हि कामे केली तरी लोकांना त्रास होणार नाही. मागील सहा महिने अनेक लोक वेगवेगळे निवेदन देण्यासाठी नगरपालिकेत येतात. परंतु मॅडम खुर्चीवर म्हणजे कार्यालयात कधीच उपस्थित नसतात. मग जनतेने तक्रारी मांडायच्या कुठे? कुणासमोर? आणि कधी? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. आजही पाणी समस्या सोडू शकता येऊ शकते. सामान्य लोकांना समजून घ्या. त्यांच्या त्रासाची जाणीव होऊद्या. फक्त कागदोपत्री कामे झाली असे दाखवू नका. लोकांच्या गराड्यात या, त्यांची कामे करा. लोक तुम्हाला एक चांगला अधिकारी म्हणून आयुष्यभर लक्षात ठेवतील. असेही पत्राच्या शेवटी रुपाली देशपांडे यांनी नमूद केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा