"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात सोलापूरसह बीड जिल्ह्याचे नावही चित्रपटसृष्टीत गाजणार!
"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात
सोलापूरसह बीड जिल्ह्याचे नावही चित्रपटसृष्टीत गाजणार!
बीड (एस.एम.न्युज़) - सोलापूरसह बीड जिल्ह्यासाठी
अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे. आतापर्यंत देश विदेशातील प्रतिष्ठित पुरस्कारांवर छाप उमटवणारा सोलापूरचे भूमिपुत्र आणि बीड जिल्ह्याचे जावई असलेले अल्ताफ दादासाहेब शेख लिखित व दिग्दर्शित "कर्मयोगी आबासाहेब" या मराठी चित्रपटाला जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मार्शे दु फिल्म मार्केटमध्ये आपल्या उपस्थितीची नोंद करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे सोलापूर सह बीड जिल्ह्याचे नाव चित्रपटसृष्टीत गाजणार आहे.
शिवाय हा गौरव केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आहे. "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटाला आतापर्यंत ३० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता या चित्रपटाची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे.
या चित्रपटाची निर्मिती मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन, मुंबई क्रिएशन इंटरटेनमेंट, रिलायन्स एंटरटेनमेंट, निर्माते बाळासाहेब महादेव एरंडे व मारुती तुळशीराम बनकर यांची आहे. दिवंगत मंत्री शेकापचे आदरणीय नेते गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांची मुख्य भूमिका या चित्रपटात अनिकेत विश्वासराव यांनी साकारली आहे. हार्दिक जोशी, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, देविका दप्तरदार, पृथ्वीक प्रताप, अरबाज शेख, वृंदा बाळ, अली शेख, अमजदखान शेख, सफर शेख, सुरेश विश्वकर्मा, महादेव शिरोळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बीडचे सय्यद एजाज अली आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्याही या चित्रपटात छोटेखानी भूमिका आहेत. या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवासात, कान्स फेस्टिव्हल मार्केट कोऑर्डिनेटर ब्रिजेश गुरणानी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे. "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटाची ही जागतिक झेप मराठी चित्रसृष्टीसाठी एक नवे दालन उघडणारी ठरणार आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा