Breaking News

बीड जिल्हा आणि क्रिकेट वर्तुळाला आश्चर्याचा धक्का पुरुष क्रिकेटपटू बनली महिला; आर्यन ऐवजी अनाया


बीड जिल्हा आणि क्रिकेट वर्तुळाला आश्चर्याचा धक्का

पुरुष क्रिकेटपटू बनली महिला; आर्यन ऐवजी अनाया

बीड (एस.एम.न्युज़) जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात जन्मलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर विषयी जाणून घेतल्यानंतर बीड जिल्हावासीयांसोबतच क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रहिवाशी असलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू तथा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर हा सुद्धा वडिलांप्रमाणेच क्रिकेटपटू झालेला आहे. आर्यन एक पुरुष क्रिकेटपटू म्हणून क्रिकेट खेळत असताना त्याने अचानक विदेशी जाऊन लिंग बदल करत पुरुषा ऐवजी महिला होऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःवर लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून घेतली. आता तो आर्यन ऐवजी अनाया झाला आहे. हे वृत्त जेव्हा माध्यमातून व्हायरल झाले, तेव्हा बीड जिल्हावासियांसह क्रिकेट वर्तुळात ही आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबद्दल सगळीकडे उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. ही वार्ता क्रिकेट खेळावर आधारित असलेल्या न्यूज 24 या प्रसिद्ध यूट्यूब चैनलने प्रसारित केली आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत