Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे कारंजे आणि रंगबिरंगी लाईट पूर्ववत सुरू करा - एस.एम.युसूफ़, रमेशराव गंगाधरे



छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे कारंजे आणि रंगबिरंगी लाईट पूर्ववत सुरू करा - एस.एम.युसूफ़, रमेशराव गंगाधरे

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी लावलेले पाण्याचे कारंजे आणि रंगबिरंगी लाईट पूर्ववत सुरू करा अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी बीड नगर परिषदेकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वरील विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात नसेल असा एकमेवाद्वितीय देखना आणि उच्च दर्जाच्या कलाकुसरीने तयार करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बीड शहराचीच नाही तर जिल्ह्याची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी बीड नगर परिषदेकडून याचे देखणे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. यासाठी सढळ हस्ते लाखो रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. तेव्हा सुशोभीकरणासाठी पुतळ्याच्या चोहोबाजूने पाण्याचे कारंजे लावण्यात आलेले आहे. उडणाऱ्या पाण्याच्या कारंज्यांसाठी रंगबिरंगी लाईट सुद्धा लावण्यात आलेले आहे. परंतु नव्या नवलाईचे नऊ दिवस म्हणतात तसे, ही यंत्रणा सुरू करून काही काळ बीड नगर परिषदेकडून चालविण्यात आली. मात्र जसे नेहमी म्हटले जाते की, शासन-प्रशासनाकडून करण्यात आलेले कोणतीही सुधारणात्मक कामे किंवा विकासात्मक कामे ही दीर्घकाळ न टिकता अल्पकाळातच त्याचे होत्याचे नव्हते होते. याचाच प्रत्यय छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबद्दल सुद्धा येतो आहे. येथील पाण्याचे कारंजे आणि रंगबिरंगी लाइट्स बंद पडलेले आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्वावर अन्याय करणारे आहे. तरी मुख्याधिकारी या नात्याने या बाबीकडे जातीने लक्ष देऊन येथील पाण्याचे कारंजे व रंगबिरंगी लाइट्स दररोज संध्याकाळी ०६:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत सुरू ठेवावे. याची अंमलबजावणी त्वरित करावी अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी निवेदनातून दिला आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत