Breaking News

महावितरण कंपनीकडून अनियमित व कमी दाबाने विद्युत पुरवठा


महावितरण कंपनीकडून अनियमित व कमी दाबाने विद्युत पुरवठा 

कारंजा टॉवर ते नुरी मस्जिद ते काली मस्जिद आणि बलभीम चौक ते कारंजा टॉवर परिसरातील नागरिक त्रस्त 

बीड (एस.एम.न्युज़) - महावितरण कंपनीकडून गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीकडून अनियमित व कमी दाबाने विद्युत पुरवठा करण्यात येत असल्याने ऐतिहासिक कारंजा टॉवर ते नुरी मस्जिद ते काली मस्जिद आणि बलभीम चौक ते कारंजा टॉवर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी या परिसरातील अनियमित विद्युत पुरवठा तसेच कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्याचा सोक्षमोक्ष लावून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य आग ओकत आहे. यामुळे सर्वांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवणे अपेक्षित असताना या परिसरात २४ तासातून अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत आहे तसेच अत्यंत कमी दाबाने होत आहे. यामुळे विद्युत उपकरणे किंवा साहित्यांना नुकसान होत आहे. फ्रिज, कुलर, पाण्याच्या मोटारी, पंखे, टीव्ही, लॅपटॉप, असल्यास एसी यांचे नुकसान होत आहे. अनेकांची ही उपकरणे आतापर्यंत जळाली आहेत. एवढेच नव्हे तर दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऐतिहासिक कारंजा टॉवर समोरील सुरू करण्यात आलेले पाण्याच्या फवाऱ्यांवर सुद्धा याचा परिणाम होत आहे. कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने येथील पाण्याचे फवारे अपेक्षित उंचीवर न जाता अर्ध्या उंचीवर जात आहे. या सर्व बाबींकडे महावितरण कंपनीचे अभियंता आणि विज बिल वसुली मोहीम साठी टिच्चून फिरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चमुचे मात्र साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकारांमुळे या परिसरातील नागरिक आणि व्यापारी गेल्या काही महिन्यांपासून मेटाकुटीस आले असून होणाऱ्या नुकसानामुळे आणि उकाळ्यामुळे जाम वैतागले आहेत. तरी महावितरण कंपनीचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी या परिसरातील अनियमित विद्युत पुरवठा तसेच कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्याचा सोक्षमोक्ष लावून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

=========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत