माजलगांव शहरातील अतिक्रमण धारकांना पी.टी.आर. द्या - सादेक पठाण
माजलगांव शहरातील अतिक्रमण धारकांना पी.टी.आर. द्या - सादेक पठाण
माजलगांव (एस.एम.न्युज़) - शहरातील अतिक्रमण हटवणार की अतिक्रमण धारकांना पी.टी.आर. देणार? असा उद्विग्न प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड सादेक पठाण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील नवीन बस स्टँड, जुने बस स्टँड, शहर पोलिस ठाणे समोर सह मुख्य रस्त्यांवर वीस बावीस वर्षांपासून अतिक्रमण आहे. दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढत चालले आहे. अतिक्रमणाबरोबर अतिक्रमण धारकांची मुजोरी वाढली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बाजार पेठ आहे. खामगाव ते पंढरपूर हा पालखी महामार्ग गेलेला आहे. महामार्ग १०० फुटाचा न राहता अतिक्रमण धारकांच्या मेहेरबानीने ३० ते ४० फुटाचा उरला आहे. या रस्त्यावर पार्किंग साठी जागा व लोकांना पायी चालण्यासाठी फूटपाथ सुद्धा राहिला नाही. अतिक्रमण धारकांनी फूटपाथवर देखील ताबा केला आहे. यामुळे छोटे मोठे अपघात होत आहे. लोकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परंतु प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासन या सर्व बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने जनतेला प्रश्न पडला आहे की, ही जागा अतिक्रमण धारकांनी खरेदी तर केली नसेल ना? बाजार पेठेतील व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. माजलगाव शहर अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी करत आहे. नागरिकांची होणारी अडचण जिल्हा प्रशासनाने या सर्व बाबीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून तात्काळ अतिक्रमण काढून घ्यावे. जर काढणे होत नसेल तर अतिक्रमणधारकांना पी.टी.आर. देऊन टाकावे. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कामगार नेते कॉम्रेड सादेक पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा