आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या ग्रंथाचे थाटात प्रकाशन एस.एम.युसूफ़ यांच्या कार्याचे केले कौतुक
आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या ग्रंथाचे थाटात प्रकाशन
एस.एम.युसूफ़ यांच्या कार्याचे केले कौतुक
बीड (एस.एम.न्युज़) - सुप्रसिद्ध आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या ग्रंथाचे दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी थाटात प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथासाठी सहकार्य करणारे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांच्या कार्याचे यावेळी अर्शद शेख यांनी तोंड भरून कौतुक केले.
अर्शद शेख हे पेशाने जरी आर्किटेक्ट असले तरी समाजातील इतर क्षेत्रात सुद्धा सातत्याने विविध कार्य करत असतात. यात सामाजिक कार्यांसह लेखन कार्यही प्रमुख आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी आर्किटेक्शचर आणि अर्शदनामा ही पुस्तके लिहिली आहेत. इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ०८:०० वा. अहेमदनगर येथील सिटी लॉन्स या मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखनऊ विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अध्यक्षस्थानी होते तर औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. ऋषिकेश कांबळे आणि विख्यात साहित्यिक डॉ. इकबाल मिन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती.
इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या ३६० पानी ग्रंथाचे प्रकाशन पूर्व वाचन करून करेक्शन करण्याचा बहुमान अर्शद शेख यांनी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांना दिला होता. युसूफ़ यांनी आलेली जबाबदारी स्वीकारून ग्रंथाचे प्रकाशन पूर्व वाचन करून उत्कृष्ट करेक्शन केल्याने आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी याप्रसंगी बीडहून कार्यक्रमात उपस्थित राहिलेले व्यावसायिक मिर्झा ख़िज़र बेग, जमात ए इस्लामी हिंद चे ज्येष्ठ पदाधिकारी सय्यद शफ़ीक़ हाश्मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे अशासकीय सदस्य सय्यद हसीन अख्तर, इंजि. मज़हर कादरी आणि मिर्झा इरतेकाझ अफ़ज़ल बेग यांच्या उपस्थितीत युसूफ़ यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी बोलताना युसूफ़ यांनी अर्शद भाई यांच्यामुळे इस्लाम आणि मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथाचे करेक्शन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच म्हणावे लागेल असे म्हटले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा