जनतेला मूर्खात काढण्यासाठी नव्हे तर केंद्र सरकारने घेतलेल्या विधेयकाला विरोध म्हणून होणार बत्ती गुल
जनतेला मूर्खात काढण्यासाठी नव्हे तर केंद्र सरकारने मांडलेल्या विधेयकाला विरोध म्हणून होणार बत्ती गुल
मुस्लिम पसर्नल लॉ बोर्डाकडून जनतेला आवाहन
बीड (एस.एम.न्युज़) - केंद्र सरकारने वक्फ बोर्ड संदर्भात मांडलेल्या विधेयकाला विरोध म्हणून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आज दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री ०९:०० ते ०९:१५ अशी १५ मिनिटे देशभरातील जनतेने आपआपल्या घरातील, दुकानातील किंवा अन्य कोणत्याही उद्योगातील दिवे बंद करून आपला विरोध दर्शवावा असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही बत्ती गुल मोहीम जनतेला मूर्खात काढण्यासाठी नव्हे तर केंद्र सरकारच्या विधेयकाला विरोध म्हणून राबविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने मांडलेल्या विधेयकाला विरोध म्हणून हा बत्ती गुल आंदोलन करण्याचा निर्णय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घेतला आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी संपूर्ण भारतातील जनतेला केंद्र सरकारने कोरोना काळात लाईट्स बंद करावयास लावलेल्या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली आहे.
कोरोना गेल्यानंतर जनतेला उशिराने का होईना जेव्हा उमगले तेव्हा आपल्याला मूर्खात काढण्यात आल्याचे लक्षात आले होते. त्या दोन वर्षाच्या काळात केंद्र सरकारने जनतेला कधी लाईट्स बंद करायला लावली होती तर कधी टाळ्या व थाळ्या वाजवायला लावल्या तर कधी एखाद्या केंद्रीय मंत्र्याने गो कोरोना गो, कोरोना गो असेही म्हणायला लावले होते. आता हे सर्व आठवले तर जनतेला हसावे की रडावे हेच कळत नाही. असो!
आज रात्री ०९:०० ते ०९:१५ या १५ मिनिटांच्या काळात मात्र जे बत्ती गुल अर्थातच दिवे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्यात जनतेला मुर्खात काढले जाणार नाही किंवा त्याचे हसूही होणार नाही तर केंद्र सरकारने वक्फ बोर्डाबाबत मांडलेल्या विधेयकाला विरोध म्हणून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हे आवाहन केले आहे. याचा बीड जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी आज रात्री ०९:०० ते ०९:१५ या १५ मिनिटाच्या काळात आपापल्या घरातील दुकानातील किंवा अन्य उद्योगातील लाईट्स बंद ठेवून या मोहिमेत सहभाग नोंदवावा आणि वक्फ सुधारणा विधेयकाविषयी आपली नाराजी शांततेने व लोकशाही मार्गाने व्यक्त करावी असे आवाहन बीड जिल्ह्यातील उलमा ए इकराम व कौन्सिल च्या वतीने करण्यात आले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा