सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद यांचा हृदयी सत्कार
सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद यांचा हृदयी सत्कार
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील पॅराडाईज हॉस्पिटलचे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद यांनी बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ओपन हार्ट सर्जरी करून आरोग्य क्षेत्रात रुग्णांसाठी एक मोठी उपलब्धी निर्माण करून दिली आहे. यामुळे पॅराडाईज हॉस्पिटल येथे डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद यांचा साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चे मुख्य संपादक शेख एजाज यांनी हृदयी सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत दैनिक जनमंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़, कॉमर्स ॲकॅडमी चे संचालक प्रा. आर.पी.कुलकर्णी आणि अविष्कार कोचिंग क्लासेस चे प्रा. सुनील खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद यांनी रुग्णसेवेत पॅराडाईज हॉस्पिटलचे एक पाऊल पुढे टाकल्याने या छोटेखानी सत्कारात सर्व उपस्थितांनी मनस्वी अभिनंदन करून यापुढेही ते रुग्णांना अशाच प्रकारे चांगल्यात चांगल्या सेवा देऊन बरे करतील, अशा अपेक्षा व्यक्त करत पुढील कार्यासाठी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा