Breaking News

मॉडेल उर्दू प्राथमिक शाळेचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश


मॉडेल उर्दू प्राथमिक शाळेचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील अजिजपुरा भागात असलेल्या प्रसिद्ध मॉडेल उर्दू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत दणदणीत यश संपादन केल्याने शाळेला घवघवीत यश मिळाले आहे.
मॉडेल उर्दू प्राथमिक शाळेच्या इयत्ता पाचवीतील 22 विद्यार्थ्यांनी यावेळी स्कॉलरशिप परीक्षेत भाग घेतला होता ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल 26 एप्रिल 2025 रोजी लागला याच शाळेतील 22 विद्यार्थ्यांपैकी सय्यदा अफिफा इम्रान, शेख अब्दुल अली इमरान, आलिया मुख्तार खान, मोमीन मिसबाह अतिख, मोमीन शोहेब अन्वर अली, शेख नाझमीन अन्वर अली, शेख अनाबिया अतिख, शेख मुहम्मद अली सिकंदर खतीब, सय्यद अनस शफिक, जुनेरा सिराज, शेख जिकरा हमीद, सय्यदा अरशिया हारून हे 12 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मॉडेल उर्दू प्राथमिक शाळेने स्कॉलरशिप परीक्षेतील आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी शुभेच्छा देऊन कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत