मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करा औसा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष खुंदमिर मुल्ला यांची मागणी
औसा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष खुंदमिर मुल्ला यांची मागणी
औसा (एस.एम.न्युज़) - मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी औसा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष खुंदमिर मुल्ला यांनी महामंडळाचे संचालक सलीम सारंग यांच्याकडे केली आहे.
याविषयी थोडक्यात वृत्त असे की, मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक महामंडळ महाराष्टृ राज्याचे संचालक सलीम सारंग हे लातुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. लातुर येथे इरफान शेख यांनी सुरतशाह वली दर्गा येथे चादर चढविण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता. मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून सध्या थेट कर्ज योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अनेक जाचक अटी व कागदपत्र खास करुन जामीनदाराच्या मालमत्तेवर बोजा टाकण्याची अट रद्द करने व १ लाख पर्यंतचे कर्ज हे मुद्रा च्या धर्तीवर विना जामीन देण्यात यावे, कर्जाची मर्यादा ३ लाख वरुन ५ लाखापर्यंत करावी. आदी मागण्या त्यांच्याकडे करण्यात आल्या. यावर त्यांनी या बाबत नक्कीच निर्णय घेऊ असे ठोस आश्वासन औसा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष खुंदमिर मुल्ला यांना दिले. खुंदमिर मुल्लांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन हृदयी सत्कार केला. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा