बीडच्या वैद्यकीय इतिहासात पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच ओपन हार्ट शस्त्रक्रिया
बीडच्या वैद्यकीय इतिहासात पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच ओपन हार्ट शस्त्रक्रिया
डॉ. मुहम्मद सिद्दीक अहेमद यांच्या प्रयत्नांमुळे हृदय रोग असणाऱ्यांचा त्रास कमी होणार
पॅराडाईज हॉस्पिटल मध्ये शासकीय योजना ही कार्यान्वित
बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासात सुप्रसिद्ध पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच ओपन हार्ट शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली आहे. यापुढेही येथे आता अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया विनासायास पार पडणार आहेत. डॉ. मुहम्मद सिद्दीक अहेमद यांनी याकरिता आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळाले असून बीड जिल्ह्यातील हृदय रोग असणाऱ्यांचा त्रास आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शिवाय येथे शासकीय योजना ही कार्यान्वित आहे आणि येथे झालेली पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया सुद्धा शासकीय योजनेत झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी ही मोठी अभिमानास्पद बाब आहे.
बीड शहरातील जिजामाता चौक परिसरातील मसरत नगर येथे असलेल्या पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये डीएनबी कार्डिओलॉजिस्ट असलेले डॉ. मुहम्मद सिद्दीक अहेमद येथे आतापर्यंत हृदयावरील ॲन्जीओग्राफी, ॲन्जीओप्लास्टी या सेवा देत होते. मात्र येथे आतापर्यंत ओपन हार्ट सर्जरी झाली नव्हती. यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणि तज्ञ डॉक्टर्स संचालक असलेले कार्डिओलॉजिस्ट डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद यांनी उपलब्ध करून प्रथमच ओपन हार्ट सर्जरी केली आहे. यामुळे या हॉस्पिटलमध्ये आता ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक शस्त्रक्रियागृह, अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे आता हृदयावरील इतरही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये विनासायास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
*ओपन हार्ट शस्त्रक्रियेसाठी आता मोठ्या शहरात जायची गरज नाही*
जिल्ह्यातील हृदयरोग असणाऱ्यांना आतापर्यंत ओपन हार्ट सर्जरीसाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात जावे लागायचे. यामुळे जास्तीचा वेळ तर लागायचाच, शिवाय अनावश्यक खर्च वाढून जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागायचा. मात्र आता ही सेवा डॉ. मुहम्मद सिद्दीक अहेमद यांनी पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्याने या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज राहिली नाही. यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे म्हणून वैद्यकीय क्षेत्राची जाण असणाऱ्यांकडून तसेच हृदयरोग असलेल्यांकडून डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद यांचे अभिनंदन होत असून आभार व्यक्त केले जात आहे.
*डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद गोरगरीब रुग्णांचे तारणहार*
बीड शहराचे भूमिपुत्र तसेच सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन डीएनबी कार्डिओलॉजिस्ट होण्यापर्यंतची वाटचाल अत्यंत यशस्वीपणे करणारे डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद हे मोठे डॉक्टर होऊनही आपली ती परिस्थिती विसरलेले नाहीत. यामुळे जेव्हा त्यांनी शहरातील सुभाष रोडवर छोट्याशा जागेत पॅराडाईज हॉस्पिटल सुरू केले तेव्हापासून दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना उपचारांसोबतच आपल्याकडून शक्य होईल तेवढी आत्मीयता देण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढत गेली म्हणून सुभाष रोडच्या दवाखान्याची जागा कमी पडू लागली. हे पाहून त्यांनी मसरत नगर येथे मोठी जागा घेत तिथे सुसज्ज असे नवीन पॅराडाईज हॉस्पिटल सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात ते एक यशस्वी हृदयरोग तज्ञ म्हणून आपली सेवा देत आहेत. रुग्ण सेवा करताना त्यांच्याकडे आलेल्या गोरगरीब रुग्णांची परिस्थिती ओळखून उपचारासह शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा आपल्याकडून होईल तेवढी आर्थिक सूट रुग्णांना देण्याचा ते प्रयत्न करतात. यामुळे ते एका खाजगी दवाखान्याचे संचालक असूनही गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब रुग्णांचे तारणहार ठरत आहेत.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा