Breaking News

राजेंद्र पवार महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू


राजेंद्र पवार महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

मुंबई (एस.एम.न्युज़) - महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवार दिनांक २५ एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

महावितरणमधील सेवेचा ३६ वर्षांचा अनुभव असणारे नवनियुक्त संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार हे मूळचे भऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यानंतर १९८९ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वाशी (ता. पेण) येथे रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले आहे. सन २०११ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. तसेच अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथे काम केले आहे. गेल्या सव्वादोन वर्षांपासून पवार हे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी याआधीच्या सेवेत लोकाभिमुख प्रशासन, ग्राहकसेवा आणि मानव संसाधन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे परिमंडलामध्ये मुख्य अभियंता म्हणून त्यांनी महसूलवाढ, नवीन वीजजोडण्या, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. सोबतच कर्मचारी प्रशिक्षण व कार्यशाळा, कर्मचारी प्रोत्साहनपर विविध उपक्रम, कर्मचारीपाल्यांची अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया आदींना मोठा वेग दिला. त्यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण व विविध उपक्रमांमुळे पुणे लघु प्रशिक्षण केंद्राला सलग तीन वर्ष राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यापूर्वी पवार यांनी स्वतः ‘ऑन फिल्ड’ राहून मुंबईचा महापूर, ‘तौक्ते’, ‘निसर्ग’ चक्रीवादळे, ‘कोरोना’ आदी संकटांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नेतृत्व केले आहे.

*‘महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मानव संसाधनाचे एक आश्वासक व्यवस्थापन सदैव उपलब्ध राहील. कंपनी व कर्मचारी हिताला प्राधान्य देत अंतर्गत प्रशासकीय कामकाज आणखी गतिमान करण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यावर भर राहणार आहे.-  राजेंद्र पवार, संचालक (मानव संसाधन)*

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत