Breaking News

शनिवारी विद्युत पुरवठा बंद राहणार ग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरण ने केले आवाहन


३३ केव्ही अंबाजोगाई उपकेंद्रावरील परिसराचा वीजपुरवठा बंद राहील

अंबाजोगाई (एस.एम.न्युज़) - ३३ केव्ही अंबाजोगाई उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या प्लिंथच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शनिवार (दि.२६ एप्रिल) रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ३३ केव्ही अंबाजोगाई वीजवाहिनीवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
३३ केव्ही अंबाजोगाई उपकेंद्रामधून वीजपुरवठा होणारे ११ केव्ही शिवाजी चौक फिडर, योगेश्वरी फिडर, मोरेवाडी फिडर, लोखंडी कृषी फिडर, वाघाळा फिडर व  हॉस्पिटल फिडरचा वीजपुरवठा बंद राहील. त्याचबरोबर ३३ केव्ही लोखंडी उपकेंद्रामधून वीजपुरवठा होणारे ११ केव्ही फिडर, सोमनाथ बोरगाव फिडर, डिघोळ अंबा फिडर, चतुरवाडी फिडर, हॉस्पिटल फिडर, एम. बी. ऍग्रो फिडर, लोखंडी सावरगाव गावठाण फिडर व लोखंडी सावरगाव कृषी फिडर  वरील वीजपुरवठा बंद राहील. तरी संबंधित सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत