वाह रे आमदार सुरेश धस!
वाह रे आमदार सुरेश धस!
किती मजूर पाहिजे मी उपलब्ध करून देतो - नवीदोद्दीन सिद्दीकी
माजलगांव (एस.एम.न्युज़) - शिरूर-पाटोदा-आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी नुकतेच गोरगरिबांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व मोफत योजना बंद कराव्यात असे म्हटले आहे यामुळे बांधकाम कामगार मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजवादी पार्टीचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दीकी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात वाह रे आमदार सुरेश धस, किती मजूर पाहिजे मी उपलब्ध करून देतो अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, सर्व सामान्य जनतेला शासनाने दिलेल्या योजनांचा लाभ देण्याऐवजी उलट राशन बंद करा म्हणणे आणि तेही ज्या जनतेच्या मतांवर ते गेल्या २५ वर्षांपासून निवडून येत आहेत एवढेच नव्हे तर मंत्री सुद्धा झाले होते. त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे त्यांना मते देणाऱ्या मतदारांची त्यांनी फार मोठी अवहेलना केल्यासारखेच आहे. याचा जेवढ्या तीव्र शब्दात निषेध करावा तेवढा कमीच आहे. गोरगरीब, दीनदलित, मोलमजुर, कष्टकरी गरीब जनता अत्यंत बिकट परिस्थितीत असल्याने केंद्र व राज्य शासनाने विविध योजनांचा लाभ देत असल्याची घोषणा केली आहे. ते सर्व सोडून उलट गरीब मजुरांचा राशन बंद करा असे बोलणे कितपत योग्य आहे? गरीब शेतकरी, मजूर, दगडफोड मजूर, बांधकाम मजूर, हमाल मजूर असे किती गरीब परिवार आहे जे शासनाच्या विविध योजना पासून वंचित आहेत. त्यांना योजनांचा लाभ देण्याऐवजी त्यांच्या प्रती असे उलट बोलणे सुरेश धसांना चांगले वाटते का? वाढत्या महागाईच्या काळात गरिबांचे राशन बंद करा म्हणतात. म्हणजे गोरगरिबांच्या थाळीत माती कालवण्याचा, त्यांचा घास हिरावून त्यांना उपाशी मारण्याचा प्रयत्न आहे. सुरेश धसांनी केलेले वक्तव्य परत घ्यावे. नसता येणाऱ्या काळात धसांना याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील असा इशाराही नवीदोद्दीन सिद्दीकी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा