बीड जिल्हा वकील संघाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी
बीड जिल्हा वकील संघाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी
बीड (एस.एम.न्युज़) - दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.
सकाळी ठीक ०७:०० वा. बीड न्यायालय परिसरातून वकील बांधवांच्या मोटर सायकल रॅलीचे आयोजन वकील संघाच्या वतीने करण्यात आले होते. वकील संघांचे अध्यक्ष ॲड. रोहिदास येवले, उपाध्यक्ष ॲड. अविनाश गडगे, सचिव ॲड. यासेर पटेल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बीड जिल्हा न्यायालय परिसरात रॅली आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. बीड वकील संघांचे अध्यक्ष ॲड. रोहिदास येवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कार्यक्रमात प्रमुख वक्ते न्यायमूर्ती एस.टी.सहारे (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर अतिशय विस्तृत माहिती दिली. यावेळी न्यायमूर्ती के.सी. माने (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर) बीड, सोनी (सचिव जिल्हा विधिसेवा प्राधिकरण बीड), न्यायमूर्ती श्रीमती विशाखा पाटील (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड), बीड वकील संघांचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ वकील, व वकील संघांचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. सुरेश वडमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. अविनाश गडगे यांनी केले.
==========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा