Breaking News

ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या परिपूर्ण नूतनीकरणासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही - एस.एम.युसूफ़, रमेशराव गंगाधरे

ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या परिपूर्ण नूतनीकरणासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही - एस.एम.युसूफ़, रमेशराव गंगाधरे 

बीड (एस.एम.न्युज़) - ऐतिहासिक कारंजा टॉवरची गेल्या दोन महिन्यात तीनच कामे झाली आहेत. उर्वरित अकरा कामांची अजूनही प्रतीक्षाच असल्याने उर्वरित कामांसाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे.
शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या कारंजा टॉवर चे परिपूर्ण नूतनीकरण करावे म्हणून दिलेल्या निवेदनाला १४ एप्रिल २०२५ रोजी पूर्ण २ महिने झाले आहे. या २ महिन्यात तिथे १० सिमेंटचे बाकडे ठेवण्यात आले तर हौदात पाण्याच्या मोटारी बसवून पाण्याचे फवारे सुरू करण्यात आले तसेच फवाऱ्यांसाठी रंगबिरंगी लाइट्स चालू करण्यात आल्या. वास्तविक पाहता कारंजा टॉवरचे नूतनीकरण परिपूर्ण करण्यासाठी १४ कामांची आवश्यकता आहे. त्यापैकी गेल्या २ महिन्यात फक्त तीनच कामे करण्यात आली असून अजूनही ११ कामांची पूर्तता करणे बाकी आहे. मात्र याकरिता बीड नगरपालिकेची आंतरिक इच्छा असल्याचे गेल्या २ महिन्यातही दिसून आले नाही. कारण दोन महिन्याच्या लांबलचक कालावधीत फक्त ३ कामे होणे म्हणजे काम करण्याची ही गती कासवगती पेक्षाही कमी असल्याचे दिसत आहे. काम करण्याची गती जर अशीच राहिली तर परिपूर्णतेसाठी आवश्यक असलेली उर्वरित ११ कामे पूर्ण होण्याकरिता अजून खूप वर्ष वाट पहावी लागेल. खरे तर कारंजा टॉवरच्या परिपूर्ण नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या कामांची यादी जिल्हा प्रशासनासह बीड नगरपालिका प्रशासन, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना सुद्धा दिलेली आहे. यामुळे नेमकी कोणती कामे करायची याकरिता प्रशासनाला कोणतीही अडचण येणार नाही. निवेदनाच्या माध्यमातून दिलेली यादी त्यांच्यासमोर आहे. तरीसुद्धा त्या यादीनुसार अजूनही कारंजा टॉवरचे परिपूर्ण नूतनीकरण केले जात नसल्याने आता कारंजा टॉवरच्या परिपूर्णतेसाठी आंदोलनाशिवाय जमणार नाही असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे.

*पाण्याचे पचरंगी कारंजे मन आकर्षित करू लागले*

गेल्या महिन्याभरापासून ऐतिहासिक कारंजा टॉवर समोरील पाण्याचे कारंजे आणि रंगबिरंगी लाइट्स सुरू करण्यात आले आहे. यात पांढरा, हिरवा, निळा, लाल आणि गुलाबी अशा प्रकारे पाच रंगाच्या लाईट्स लावण्यात आल्या आहेत. ते दररोज संध्याकाळी ०७:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत चालविण्यात येत आहेत. यामुळे फक्त कारंजा टॉवरच नाही तर परिसरात एक प्रकारचे आकर्षण निर्माण झाले आहे. या कारंजांमुळे नयनरम्य शोभा वाढल्याने येथे ठेवण्यात आलेल्या १० सिमेंटच्या बाकड्यांवर आबालवृद्ध येऊन बसत आनंद घेत आहेत.

*कचरा आणि अतिक्रमणाची साडेसाती पिच्छा सोडेना*

पाण्याचे पचरंगी कारंजे सुरू केल्याने विलोभनीय दृश्य दिसत असले तरी कारंजा टॉवरच्या इमारतीला पश्चिम आणि उत्तर दिशेचे अतिक्रमण आणि टाकण्यात येत असलेला कचरा काही पिच्छा सोडायला तयार नाही. या दोन्ही प्रश्नांकडे  बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे.

 ===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत