Breaking News

*उर्दू भाषेवरील जातीयतेचे मळभ न्यायालयाने केले दूर* *सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल*


 *उर्दू भाषेवरील जातीयतेचे मळभ न्यायालयानेच केले दूर*

*सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल*

बीड (एस.एम.न्युज़) - उर्दू भाषेवरील जातीयतेचे मळभ शेवटी न्यायालयानेच दूर करत उर्दू फक्त मुस्लिमांची नाही तर भारतीय भाषा आहे असा निकष नोंदवून महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामुळे उर्दू भाषेला जातीयतेच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांना जबरदस्त आणि कायमची चपराक बसली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाषा प्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
याविषयी थोडक्यात वृत्त असे की, महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेच्या मंडळावर मराठीसह उर्दू भाषेच्या वापराला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेविका वर्षा संजय बगाडे यांनी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावत कडक टिप्पणी करत, भाषेला कोणताही धर्म नसतो आणि उर्दूला फक्त मुस्लिमांची भाषा मानने हे भारताच्या वास्तवाचे आणि विविधतेमधील दुर्दैवी गैरसमज आहे. तत्पूर्वी प्रथम ही याचिका नगर परिषदेने आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळली होती. यामुळे सौ. वर्षा बगाडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले की, भाषा ही कोणत्याही धर्माची नाही, तर एका समुदायाची, प्रदेशाची आणि लोकांची आहे. भाषा ही संस्कृती आहे. भाषेला धर्म नसतो आणि ती समाजाच्या सभ्यतेच्या प्रवासाचा एक मापदंड आहे. उर्दू भाषा ही भारताच्या भूमीवर जन्मास आली आहे. उर्दूला परदेशी भाषा किंवा फक्त एकाच धर्माची भाषा मानने पूर्णपणे चुकीचे आहे. उर्दूला परदेशी भाषा किंवा केवळ एका विशिष्ट धर्माची भाषा मानने पूर्णपणे चुकीचे आहे. महाराष्ट्र सार्वजनिक प्राधिकरण (अधिकृत भाषा) कायदा, २०२२ मध्ये उर्दू भाषेच्या वापरावर कोणतेही बंधन नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत "उर्दू है मेरा नाम, मैं 'ख़ुसरो' की पहेली
क्यूँ मुझ को बनाते हो तअस्सुब का निशाना
मैंने तो कभी ख़ुद को मुसलमाँ नहीं माना
देखा था कभी मैंने भी ख़ुशियों का ज़माना
अपने ही वतन में हूँ मगर आज अकेली" हा शेर ही निकालात नमूद केला आहे. तसेच मराठीचा वापर अनिवार्य आहे, परंतु त्यासोबत इतर भाषांचा वापर प्रतिबंधित नाही. म्हणून ही याचिका कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्यावर आधारित आहे आणि ती फेटाळण्यात येत आहे. असा महत्वपूर्ण निकाल उर्दू भाषेविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे उर्दू भाषेवरील जातीयतेचे मळभ एकदाचे दूर झाले आहे. तसेच उर्दू भाषेला जातीयतेच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांना या निकालामुळे जोरदार चपराक बसल्याने भाषा प्रेमींमधून न्यायालयाने दिलेल्या या निकालाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.

*उर्दू भाषा ही अत्यंत गोड आणि भारतात जन्मलेली - सय्यद हसीन अख्तर*

उर्दू भाषेविषयी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयाने एका चांगल्या शुद्ध भारतीय आणि गोड भाषेला न्यायालयाकडून न्याय मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून जात्यांधांकडून उर्दू भाषेला वेठीस धरण्याचे धोरण या निकालामुळे आता बंद होतील. एका भाषेमुळे जाती-जातीत, समाजा-समाजात विष कालवण्याचे काम सुद्धा बंद होतील. यामुळे न्यायालयाच्या या निकालाचे मनापासून स्वागत आहे.

*वर्षा बगाडे यांचे मनापासून आभार - एस.एम.युसूफ़*

काही गलिच्छ राजकारणी आपल्या सडक्या मेंदू आणि जातीयतेच्या नजरेतून उर्दू भाषेविषयी नेहमी नको ते उद्योग करीत होते. उर्दू भाषेचे कोलीत करून असे लोक नगर परिषदा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा किंवा तत्सम शासकीय-प्रशासकीय कार्यालयांमध्ये उर्दू भाषेतून नाम फलक लावण्यास सुद्धा मज्जाव करायचे. यामुळे समाजातील वातावरण बिघडत असे. मात्र अशांचे जातीय राजकारण मस्तपैकी चालायचे. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे अशा उपटसुंभांच्या समाज विघातक कृती पासून जनतेला सुटका मिळाली आहे. माजी नगरसेविका वर्षा बगाडे यांनी उर्दू भाषेच्या आकसापोटी नगर परिषदेपासून सुरू केलेला वाद न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेला. यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण निकालामुळे जातीय विष पेरणाऱ्यांच्या राजकारणावर आता कायद्याचा अंकुश लागेल. यामुळे वर्षा बगाडे या उर्दू विरोधी असल्या तरी त्यांच्यामुळेच हा ऐतिहासिक निकाल लागल्याने त्यांचे मनापासून आभार.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत