शफीक भाऊंनी, समाजात हॅरिसन फ्रान्सिस रेड्डींचे विस्मरण पडू देऊ नये - एस.एम.युसूफ़
शफीक भाऊंनी, समाजात हॅरिसन फ्रान्सिस रेड्डींचे विस्मरण पडू देऊ नये - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी पक्षाचे दिवंगत मुख्य प्रवक्ते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांचे समाजात विस्मरण पडू देऊ नये असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी साहेबांचे निधन होऊन चार वर्षे झाली आहेत. हा माणूस माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक अनमोल हिरा होता. साधा, सरळ, सोज्वळ, कोणाबद्दलही मनात आकस, द्वेष न ठेवणारा परंतु नियतीने त्यांना आपल्यातून अचानक हिरावून नेले. संपूर्ण आयुष्य अत्यंत कफल्लकतेत व्यतीत केलेल्या या माणसाच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी ॲड. शेख शफीक भाऊ आणि एआयएमआयएम पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी मी सुद्धा उपस्थित होतो. तेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणींना धीर देत शफीक भाऊंनी लहान भावासारखे पक्षाकडून ४७ हजार ५०० रुपये आर्थिक मदत म्हणून दिले होते. आता त्यांच्या त्या बहिणही जगात नाहीत. त्यांचेही निधन झाले आहे. हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांच्यासारख्या चांगल्या सच्च्या, इमानदार आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी २० एप्रिल रोजी एआयएमआयएम पक्षाकडून काहीतरी विधायक कार्य घेण्यात यावे. ॲड. शेख शफिक भाऊंनी रेड्डी साहेबांसारख्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे विस्मरण समाजात पडू देऊ नये असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी म्हटले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा