शेख निजाम यांनी अन्नदान करून साजरी केली हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांची पुण्यतिथी
बेघर निवारागृहात राजकीय, सामाजिक क्षेत्रासह पोलीस अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
बीड (एस.एम.न्युज़) - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते शेख निजाम यांनी एआयएमआयएम पक्षाचे दिवंगत जिल्हा प्रवक्ते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांची चौथी पुण्यतिथी शहरातील बेघर निवारागृहात बेघरांना अन्नदान करून साजरी केली. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी हे समज आल्यापासून सामाजिक चळवळीत नेहमी सक्रीय असायचे. जे प्रश्न जनहिताचे आहेत ते प्रश्न उचलण्यांसाठी ते सदैव पुढे यायचे. शिवाय त्यांचे वक्तृत्व आणि भाषण करण्याची शैली ही सडेतोड, परखड आणि आक्रमक असायची. त्यांची ही शैली बघून एआयएमआयएम पक्षाचे तत्कालीन बीड जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी त्यांना पक्षात घेतले होते. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी रेड्डींना प्रथम पक्षाचे प्रवक्ते केले व नंतर मुख्य जिल्हा प्रवक्ते पद सुद्धा दिले होते. अशा प्रकारे निजाम यांनी त्यांना पक्षाचे मोठे व्यासपीठ मिळवून दिल्याने रेड्डींनी आपल्या बुलंद भाषणांनी प्रस्थापितांना सळो की पळो करून सोडले होते. निजाम यांचे जिल्हाध्यक्ष पद गेल्यानंतरही रेड्डी हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून मृत्यू पर्यंत कार्यरत होते. एका मोठ्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते असूनही नेहमी पाय जमिनीवर ठेवून जगलेल्या रेड्डी सारख्या भल्या माणसाला त्यांच्या मृत्यूनंतरही शेख निजाम विसरले नाही. आपल्या या जुन्या सहकाऱ्याच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांनी दिनांक २० एप्रिल २०२५ रविवार रोजी संध्याकाळी शहराच्या भाजी मंडई परिसरातील बेघर निवारा केंद्रात बेघरांना अन्नदान करून हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी शेख निजाम, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ, मोमीन ज़ुबेर, सय्यद आजम, सायमन रेड्डी, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते रहमत पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवा नेते फारुक शेख, बेघर निवारागृह चे संचालक अभिजीत वैद्य, व्यवस्थापक राजू वंजारे, एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, बेघर निवारागृह तील महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरिक तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रासह पोलीस अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. सर्व उपस्थितांनी हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिली.
*मान्यवरांचे थोडक्यात मनोगत*
हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांच्यासारखा निस्वार्थी माणूस राजकारण आणि समाजकार्यात मिळणे आता कठीण आहे. प्रत्येकासाठी निस्वार्थ भावनेने झटणारा परंतु कुणाकडून काहीही अपेक्षा न ठेवता काम करणारा अवलिया माणूस म्हणजे हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी होते.
*- शेख निजाम*
(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष नेते)
-----------------------
हॅरी भाई सारखे सोज्वळ लोक मिळणे आता दुरापास्त झाले आहे. हा माणूस जग सोडून गेला असला तरी बीड जिल्हावासियांच्या मनातून मात्र कधीही जाणार नाही.
*- विजय जाधवर*
सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, बीड.
-----------------------
रेड्डी साहेब माणसाच्या रूपात खरेच अवलिया होते. माफक इच्छा, अपेक्षा, मनात कुणाबद्दल द्वेष भाव नाही, सर्वांना नेहमी योग्य आणि चांगले तेच मार्गदर्शन करणारे, आपल्या आचरणाने समोरच्याला पटकन आपलेसे करणाऱ्या रेड्डी साहेबांना विसरणे अशक्य आहे.
*- एस.एम.युसूफ़*
पत्रकार, बीड
-----------------------
हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने येथे जमलेले सर्व मान्यवर वेगवेगळ्या जाती-धर्मातील आहेत. तरीसुद्धा या सर्वांनी एकत्र येऊन हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांची पुण्यतिथी आपल्या बेघर निवारागृहात आपला अमूल्य वेळ देऊन साजरी केली. निजामभाईंनी अन्नदान केले. यामुळे आपल्या भारत देशातील सर्वधर्मसमभावाची प्रचिती येते.
*- राजू वंजारे*
व्यवस्थापक - बेघर निवारागृह, बीड.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*







कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा