वक्फ बिल इनामदार, जागीरदारांवरच नाही समस्त मुस्लिम समाजावर अन्यायकारक
वक्फ बिल इनामदार, जागीरदारांवरच नाही समस्त मुस्लिम समाजावर अन्यायकारक
मौलाना आझाद युवा मंच लढा देणार - अरफात खान, सय्यद सलमान
बीड (एस.एम.न्युज़) - केंद्र सरकारने बनविलेले वक्फ बिल फक्त इनामदार किंवा जागीरदारांवरच नाही समस्त मुस्लिम समाजावर अन्यायकारक आहे. हे बिल रद्द करण्यात यावे, याकरिता मौलाना आझाद युवा मंच लढा देणार असे मंचचे मराठवाडा अध्यक्ष अरफात खान पठाण आणि सय्यद सलमान यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, देशात २०१४ सालापासून मुस्लिम विरोधी भाजप केंद्रात सत्ताधारी आहे. इतर पक्षांची फोडाफोडी करून केंद्रासह राज्यातही सत्तेवर बसली आहे. हा पक्ष आपल्या भारत देशाची सर्वधर्मसमभाव ही संकल्पना मान्य करत नाही. यांनी जनमनात एकमेकांच्या धर्माविषयी, जातींविषयी घृणा, तिरस्कार, भेदाभेदचे विष पेरले आहे. अशाच प्रकारे या पक्षाने त्यांच्यासोबत गेलेल्या इतर बगलबच्च्या पक्षांना दाबदडप करून वक्फच्या जमिनी ज्या मोठ्या प्रमाणात इनामदार आणि जागीरदार यांच्या अखत्यारित होत्या, त्या हस्तगत करून गिळंकृत करण्याचा घाट घातला आहे. यामुळे मुस्लिम समाजातील फक्त इनामदार किंवा जागीरदार यांच्यावरच अन्याय होणार नसून समस्त मुस्लिम समाजावर हा फार मोठा अन्याय आहे. हे बिल रद्द करण्याचे यावे, याकरिता मौलाना आझाद युवा मंच संपूर्ण ताकदीनिशी लढा देणार आहे. असे मंचचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अरफात खान पठाण आणि सय्यद सलमान यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा