Breaking News

शेरखान सरांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण


मुख्याध्यापक शेरखान सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मिल्लिया शाळेत वृक्षारोपण

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील सुप्रसिद्ध मिल्लिया प्राथमिक (मुलांची) शाळेचे मुख्याध्यापक शेरखान सर यांचा वाढदिवस शाळेत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
शेरखान सर हे पेशाने जरी मुख्याध्यापक असले तरी त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने सहभाग असतो. समाजात वावरताना आपल्याकडून समाजातील दीनदलित, गोरगरीब, गरजू लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी शक्य होईल ते कार्य करण्यास ते नेहमी पुढाकार घेतात. नुकताच त्यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांचे सहशिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी झाडांची रोपे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. त्यांनी सहकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या झाडांची रोपे ही शाळेच्या आवारातच रोपित केली. यावेळी पठाण अमजद, शेख वसीम, वरिष्ठ लिपिक इम्रान सर, मोमीन अज़हरोद्दीन सर, इक्बाल सर, मिल्लिया शाळेचे शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
==========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत