Breaking News

ॲड. अक्षय मुळे यांचा युक्तिवाद ग्राह्य


ॲड. अक्षय मुळे यांचा युक्तिवाद ग्राह्य

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत जामीन मंजूर

बीड (एस.एम.न्युज़) - पोलीस भरती करणाऱ्या तीन तरुणांना एसटीने चिरडल्याची घटना पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी एसटीचे चालक कुलदीप मुसळे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. या प्रकरणाचा युक्तिवाद ॲड. अक्षय मुळे यांनी केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी कुलदीप मुसळे यांना जामीन मंजूर केला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, गोकुळ नवनाथ घोडके वय २८ वर्षे व्यवसाय शेती व हॉटेल चालक रा. घोडका राजुरी ता.जि. बीड यांनी समक्ष पोलीस ठाणे पिंपळनेर येथे हजर होवुन फिर्याद दिली की, बीड ते परळी जाणाऱ्या रोड लगत घोडका राजुरी शिवारात स्वराज हॉटेल येथे सकाळी ५ वा. सुमारास साफसफाई करत असतांना १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०५.३० वा. सुमारास माझ्या हॉटेलचे समोर माझा पूतण्या ओम सुग्रीव घोडके व आमच्या गावातील विराट बब्रुवान घोडके, सुबोध बाबासाहेब मोरे, आदित्य बळीराम डरपे, आदित्य लक्ष्मण घोडके सर्व रा. घोडका राजुरी असे घोडका राजुरी ते पिंपळगाव मोची फाटा ईथपर्यंत नेहमीप्रमाणे रनिंग करून माझ्या हॉटेल समोर रोडच्या बाजूला व्यायाम करत थांबलेले होते. मी माझ्या हॉटेल समोर साफसफाई चे काम करत होतो. सकाळी ०६.१० वा सुमारास बीड-परळी रोडवर बीडकडून एक एसटी बस आली व रोड सोडून एसटी बस रोडच्या डाव्या बाजूच्या पंख्यावर येऊन तेथे व्यायाम करणारे आमच्या गावातील तरुणांना जोराची धडक दिली. त्यावेळी सदर बस ओम सुग्रीव घोडके, विराट बब्रुवान घोडके, सुबोध बाबासाहेब मोरे सर्व रा. घोडका राजूरी, ता.जि.बीड यांच्या अंगावर एसटी बस गेली. तेव्हा त्या चालकाने त्या ठिकाणी बस उभा न करता त्यांना फरपटत गाडीच्या खाली ओढत घेऊन गेला. त्यामूळे त्यांना गंभीर दुखापत व अंगाचा चेंदामेंदा होऊन ओम सुग्रीव घोडके व आमच्या गावातील विराट बब्रुवान घोडके हे दोघे जागीच मरण पावलेले दिसले व सूबोध बाबासाहेब मोरे हा जिवंत होता त्याची हालचाल सूरू होती. सदर तरुणांसोबत असलेले आदित्य बळीराम डरपे, आदित्य लक्ष्मण घोडके सर्व रा. घोडका राजुरी, ता.जि. बीड यांनी एसटी बस अंगावर येत असल्याचे पाहून त्यांनी रोडच्या बाजूला उड्या मारल्याने ते पण जखमी झालेले आहेत. त्यानंतर अपघात करून गेलेली एसटी बस च्या चालकाने एसटी बस तेथून पूढे इंग्लीश स्कूल जवळून वळऊन पून्हा बीडकडे वेगाने जात नेली. त्या बसचा नंबर पाहीला तो चक्१४इढ१४७३ असा होता. त्यानंतर मी ताबडतोब गावातील माझे नातेवाईक व इतर मूलांचे नातेवाईकांना फोन केला व घटनेची माहिती दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सदर मूलांचे नातेवाईक व इतर गावातील लोक घटनेच्या ठिकाणी आले होते. घटनेमध्ये जखमी झालेला सुबोध बाबासाहेब मोरे यास आमच्या गावातील पिराजी डरपे यांचे जिप मध्ये घालून उपचार कामी बीड येथे घेऊन गेले व जागीच मयत झालेले ओम सुग्रीव घोडके, विराट बब्रुवान घोडके असे दोन्ही मूलांना बीड येथून रुग्नवाहीका बोलाऊन घेऊन सरकारी दवाखाना येथे घेऊन गेलोत. आम्ही बीड ला जाते वेळी घटना करून गेलेली एसटी बीड कडे जाताना पांगर बावडी शिवारमध्ये रोडच्या बाजूला विट भट्टी जवळ मातीच्या ढिगाऱ्यावार जाऊन बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. त्यावेळी पण मी व आमच्या गावातील लोकांनी एसटी बस पाहीली असता तिचा नंबर एम.एच.१४/बी.टी. १४७३ असा असल्याचे दिसले. त्यावेळी पिंपळनेर पोलीस स्टेशन चे पोलीस घटनास्थळावर आले होते. सरकारी दवाखाना बीड येथे औषधोपचारकामी पाठविलेला सूबोध बाबासाहेब मोरे याचा पण औषधोपचार दरम्यान मृत्यू झाला. मयत झालेल्या तिन्ही तरुणांच्या प्रेताचा पोलीसांनी पंचनामा करून डॉक्टरांनी पोस्टमार्टम केल्यानंतर त्यांचे प्रेत गावी आणून घोडका राजूरी येथे नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी त्यांचा अंत्यविधी केला आहे. सदर घटनेमध्ये जखमी झालेले आदित्य बळीराम डरपे, आदित्य लक्ष्मण घोडके हे सरकारी दवाखाना बीड येथे औषधोपचार घेत आहेत. त्यानंतर आम्हाला समजले की, एसटी बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. १४७३ ही बीड वरून परभणी येथे जात होती व तिचा चालक कूलदिप देविदास मूसळे बॅच नंबर १७९८५ हा असल्याचे समजले आहे. घटनेमध्ये जखमी झालेले तरुण खूप घाबरलेले असल्याने व मी सदरची घटना समक्ष पाहीली असल्याने एसटी बस चालकाविरुध्द गोकुळ नवनाथ घोडके यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनंतर चालक कुलदीप मुसळे वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ॲड. अक्षय मुळे यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीला गुन्ह्यांत जामीन मंजूर केला. या प्रकरणी मार्गदर्शन ज्येष्ठ विधिज्ञ के. एस.पंडित यांनी केले तर ॲड. अभिजीत कदम, ॲड. यशवंत जगताप यांनी सहकार्य केले.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत