जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांनीही मनसोक्त आनंद घ्यावा
जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांनीही मनसोक्त आनंद घ्यावा
सिमेंट बाकड्यांमुळे ऐतिहासिक कारंजा टॉवर ची शोभा वाढली
बीड (एस.एम.न्युज़) - ऐतिहासिक कारंजा टॉवर लगत ठेवण्यात आलेल्या सात सिमेंट बाकड्यांमुळे या ऐतिहासिक वास्तूची शोभा वाढली आहे. इथे जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांनीही येऊन बसत मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन कारंजा टॉवर चे परिपूर्ण नूतनीकरण करण्यात यावे ही मागणी करणारे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, तालेब पटेल, मिर्झा अब्दुल रऊफ़ बेग, फारुख शेख आदींनी केले आहे.
ऐतिहासिक कारंजा टॉवरचे नूतनीकरण २०१४ साली सुरू करण्यात आले होते. त्यास १० वर्ष उलटूनही अद्याप नूतनीकरण परिपूर्ण करण्यात आलेले नाही. फक्त इमारतीला आतून बाहेरून प्लास्टर करून सोडून देण्यात आले आहे. रंगरंगोटी केली नाही. इमारती समोर बनविलेल्या हौदातील पाण्याचे फवारे सुरू केले नाही. जिल्हा प्रशासनाची अनास्था आणि बीड नगर परिषदेचा हलगर्जीपणा यामुळे या ऐतिहासिक इमारतीची देखरेख करण्यासाठी एखादा सरकारी कर्मचारीही नियुक्त केलेला नाही. प्रशासनिक स्तरावरील अशा प्रकारची अनास्था आणि हलगर्जीपणामुळे बघता-बघता कारंजा टॉवर ची दुर्दशा झाली. या इमारतीच्या तिन्ही बाजूंनी अस्ताव्यस्त गाड्या लावण्यात येतात. इमारतीच्या भिंतींवर पोस्टर चिटकविण्यात येतात. मोठमोठाले अगडबंब डिजिटल बॅनर लावले जातात. काही नतदृष्ट, बिनडोक आणि नालायक लोक टॉवर समोर मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकतात. यामुळे या ऐतिहासिक इमारतीची पार रया गेली आहे. या इमारतीला पूर्व वैभव प्राप्त व्हावे, कारंजा टॉवर पूर्वीसारखे दैदीप्यमान रुबाबदार आणि आकर्षक दिसावे. याकरिता गेल्या १० वर्षांपासून जिल्हा प्रशासनासह बीड नगर परिषदेकडे अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. शिवाय प्रसिद्धी माध्यमातून बातम्या आणि लेख सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. तरीही निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचे झालेले जिल्हा प्रशासन आणि बीड नगर परिषदेवर याचा कुठला ही परिणाम होत नसल्याने आता कारंजा परिसर, अज़ीज़पुरा आणि खंदक येथील नागरिकांनी मिळून कारंजा टॉवर चा चेहरा मोहरा चांगला करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. यातूनच कारंजा टॉवर लगत सिमेंटचे सात बाकडे ठेवण्यात आले आहे. या बाकड्यांवर बाल गोपाळांपासून ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिक बसत असल्याने कारंजा टॉवरची शोभा वाढली आहे. यामुळे बसणाऱ्यांसह बघणाऱ्यांनाही आनंद होत आहे. प्रशासनाने आता तरी मृतावस्थेतून जागे व्हावे आणि कारंजा टॉवरच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक ती सर्व कामे करावीत असे आवाहन एस.एम.युसूफ़, रमेशराव गंगाधरे, तालेब पटेल, मिर्झा अब्दुल रऊफ़ बेग, फारुक शेख आदींनी केले आहे.
*अधिकारी कारंजा टॉवर व निवेदनाची दखल घेत नाही*
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके या सर्वांना कारंजा टॉवरच्या परिपूर्णतेसाठी दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी निवेदन दिलेले आहे. याला आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. तरीही चौघांपैकी एकाही अधिकाऱ्याने आतापर्यंत याची नोंद आपल्या पातळीवर घेतल्याचे दिसून येत नाही.
*चारही अधिकाऱ्यांना येथे येण्याचे निमंत्रण!*
निवेदन देण्यात आलेल्या जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांनी येथे जातीने येऊन बसत मनसोक्त आनंद घ्यावा तसेच कारंजा टॉवरची आतून बाहेरून सर्व पाहणी करत नूतनीकरणाचे अपूर्ण असलेले कार्य पूर्ण करण्याचे कार्य हाती घ्यावे. असे आवाहनही करण्यात आले आहे.
*कारंजा टॉवरच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक असलेली कामे*
१.कारंजा टॉवरचे तुटलेले दार बदलून नवीन दार लावणे, २.बंद पडलेल्या घड्याळी सुरू करणे, ३.इमारतीला आतून बाहेरून रंगरंगोटी करणे, ४.इमारतीवर चारही बाजूने प्रकाश टाकणारे हाय मास्ट दिवे लावणे, ५.जवळील दोन्ही झाडांच्या टॉवर ला चिटकलेल्या फांद्या छाटणे, ६.पाण्याच्या फवाऱ्यासाठी बनविलेल्या हौदात विद्यूत मोटर बसवून पाण्याचे फवारे सुरू करणे, ७.पाण्याच्या फवाऱ्यांसाठी रंगबिरंगी विद्युत रोषणाईचे दिवे लावणे, ८.इमारती समोर तसेच या परिसरात डिजिटल होल्डिंग लावण्यास कायमस्वरूपी कडक बंदी घालणे, ९.कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक प्रतिबंधित सक्तीच्या कारवाया करणे, १०.इमारतीच्या पश्चिम आणि उत्तर बाजूच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, ११.काँक्रिटीकरण झाल्यावर पश्चिम व उत्तर बाजूस दक्षिण बाजू सारखे सिमेंटचे बाकडे ठेवणे, १२. टॉवरची देखभाल आणि सुरक्षेकरिता बीड नगर परिषदे चा प्रत्येकी किमान एक-एक कर्मचारी दिवस-रात्र कायमस्वरूपी नियुक्त करणे इत्यादी कामे प्रशासनाने युद्ध पातळीवर करणे आवश्यक आहे.
============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा