उद्योजिका, लेखिका रूपाली देशपांडे स्त्री रत्न पुरस्काराने सन्मानित
उद्योजिका, लेखिका रूपाली देशपांडे स्त्री रत्न पुरस्काराने सन्मानित
बीड (एस.एम.न्युज़) - दैनिक समर्थ राजयोग आणि आश्रय सेवा केंद्र, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यस्तरीय 'स्त्री रत्न' पुरस्कार सोहळा २०२५, शनिवार दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. हॉटेल नीलकमल हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यात बीड शहरातील प्रसिद्ध उद्योजिका तथा लेखिका रूपाली देशपांडे यांना स्त्री रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक समर्थ राजयोग आणि आश्रय सेवा केंद्र, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यस्तरीय 'स्त्री रत्न' पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीने नावलौकिक मिळविलेल्या महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विविध व्यवसाय करत आज रिच इव्हेंट्स आणि रिच टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून नावलौकिक मिळविलेल्या उद्योजिका तसेच वृत्तपत्रातून अनेक सामाजिक समस्या आणि प्रश्नांना आपल्या लेखणी द्वारे मांडणाऱ्या लेखिका रूपाली जयंत देशपांडे यांना स्त्री रत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी होते. विशेष अतिथी तथा प्रमुख सत्कारमुर्ती म्हणून प्राजक्ता सुरेश धस होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपविभागीय जिल्हाधिकारी कविता जाधव, माजी आमदार ॲड. उषा दराडे, पोलीस उपाधीक्षक पुजा विठ्ठल पवार, उपविभागीय पोलीस अधीक्षक विश्वांभर गोल्डे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, एलसीबी चे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ, तहसीलदार चंद्रकांत शेळके, प्रभारी गटशिक्षणाधिकारी समंदर खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
रूपाली देशपांडे यांच्या कार्यकर्तुत्वाची नोंद घेऊन त्यांना स्त्री रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सविता देव, जयंत देशपांडे, राजेश राजूरकर, स्वाती राजूरकर, जयदीप परळकर, जयसिंग मामा चुंगडे, डॉ. प्रदिप कुमार उजेगर, हरीश मोटवाणी, गंगाबिशन करवा, संपादक दिलीपजी खिस्ती यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा